स्वत:च्या आनंदासाठी मला जन्म दिला, आई-वडिलांविरोधात मुलगा कोर्टात

स्वत:च्या आनंदासाठी मला जन्म दिला, आई-वडिलांविरोधात मुलगा कोर्टात

मुंबई: आई-वडिलांनी स्वत:च्या आनंदासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी, माझ्या परवानगीविना मला जन्म दिला आहे, अशी अजब तक्रार मुलाने केली आहे. हा मुलगा थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. रफाएल सॅम्युअल असं या बहाद्दराचं नाव आहे. रफायलने स्वत:च्या फेसबुकवर याबाबतची पोस्ट केली. मात्र काही काळानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली.

माझी परवानगी न घेता आई-वडिलांनी मला जन्म दिला, असं रफाएलचं म्हणणं आहे. 27 वर्षीय रफायल म्हणतो, “आई वडिलांवर माझं प्रेम आहे, मात्र त्यांनी केवळ स्वत:च्या आनंदासाठी मला जन्मला घातलं. स्वत:च्या स्वार्थासाठी मला जन्म दिला असेल, तर मी कष्ट का करावं? मी त्रास का झेलावा”?

रफाएल सॅम्युअलने अँटी नेटलिज्मवर दुसरी एक पोस्ट केली. मानवी जीवनात खूप समस्या आहेत. त्यामुळे लोकांनी मुलांना जन्म देणे बंद केले पाहिजे, अशी अँटी नेटलिज्मची विचारधारा आहे.

दरम्यान, रफाएलच्या आईनेही पोस्टमध्ये आपल्या मुलाची प्रशंसा केली पण त्याचवेळी त्याची फिरकीही घेतली. मुलाला जन्म देण्यापूर्वी मी त्याची परवानगी कशी घेऊ शकते, हे जर रफाएल कोर्टात सिद्ध करू शकला, तर मी माझी चूक मान्य करेन, असं आईने म्हटलं. दुसरीकडे मी एक सामाजिक हेतू ठेऊन ही पोस्ट केली आहे असं सॅम्युएल म्हणत आहे


Published On - 11:40 am, Thu, 7 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI