अभिनेत्री पायल रोहतगीचं शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान

Namrata Patil

|

Updated on: Jun 03, 2019 | 10:03 PM

मुंबई : वादग्रस्त विधानासाठी कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नसून, त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता”, असे वादग्रस्त ट्वीट पायलने केलं आहे. तिच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. पायल रोहतगी ही आपल्या वादग्रस्त विधानामुळे […]

अभिनेत्री पायल रोहतगीचं शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान

मुंबई : वादग्रस्त विधानासाठी कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नसून, त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता”, असे वादग्रस्त ट्वीट पायलने केलं आहे. तिच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पायल रोहतगी ही आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असते. याआधीही तिने नथुराम गोडसे, सतीप्रथा, सनातन संस्था याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी मात्र तिने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी 1 जूनला पायलने ट्विटरच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोखाली तिने “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत. त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला आहे”, असे या ट्विटमध्ये म्हंटल आहे. ट्विटर आणि इनस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना तिने पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोखाली छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर “महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं?” असा प्रश्न विचारत तिने मराठा आरक्षणाविषयीही मुक्ताफळं उधळली आहेत.

पायलने केलेल्या या ट्वीटनंतर तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर तिने तिच्या आधीच्या ट्वीटबाबत खुलासा करण्यासाठी आणखी एक वादग्रस्त ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये “शेतकरी कुटुंबात किंवा क्षुद्र वर्णात जन्माला येणं हा गुन्हा नाही. मात्र काही जण शिवाजी महाराजांचा जन्म क्षत्रिय कुळात झाल्याचं म्हणतात. ते योग्य आहे. कारण आपल्या देशातील भारतीय हिंदू लोकांना राजाबद्दल खऱ्या माहितीची कल्पना नाही”, असे तिने म्हटलं आहे.

याआधीही पायलने अनेक महापुरुषांबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे. काही महिन्यांपूर्वी ती राजाराम मोहन रॉय यांना ‘ब्रिटीशांचा चमचा’ म्हणाली होती. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे या कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी पोस्ट टाकली होती.

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर पायलनं नुकतंच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मला शिवाजी महाराज कोणत्या वर्णात जन्माल आले आहेत. याबाबत मला जाणून घ्यायचे होते. मात्र मला त्यावर उत्तर देण्याऐवजी मराठा लोकांनी माझ्यावर टीकास्त्र सोडले. अशी प्रतिक्रिया तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI