मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने या परिसराची तपासणी केली. संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.