पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांचा विचार केला, महाराष्ट्राला दिलं मोठं गिफ्ट

मुंबईतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचं महाराष्ट्राला गिफ्ट दिलंय. सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेसला मोदींना हिरवा झेंडा दाखवत, प्रवाशांचा प्रवास सुसाट केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांचा विचार केला, महाराष्ट्राला दिलं मोठं गिफ्ट
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 11:30 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार 10 फेब्रुवारी हा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला 2 वंदे भारत ट्रेन्स दिल्यात. मोदींनी या ट्रेन्संच लोकार्पण केलं. मुंबईतून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या या दोन्ही सुपरफास्ट ट्रेन्सला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. पण संजय राऊतांनी मुंबई महापालिकेशी कनेक्शन जोडून टीका केलीय.

मुंबईतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचं महाराष्ट्राला गिफ्ट दिलंय. सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेसला मोदींना हिरवा झेंडा दाखवत, प्रवाशांचा प्रवास सुसाट केला.

या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस तीर्थक्षेत्रासाठी फार महत्वाच्या आहेत. कारण एकाच दिवसांत मुंबईतून शिर्डीत ये जा करत साईबाबांचं दर्शन घेणं शक्य होणार आहे. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या सीएसएमटीहून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुटणारशिर्डीहून संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी सुटेल.

हे सुद्धा वाचा

एकूण 5 तास 20 मिनिटाचा प्रवास असेल. दादर, ठाणे,नाशिक रोडला थांबे देण्यात आलेत. सीएसएमटी सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळं विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि आई तुळजाभवनीचं घेणं सोपं होणार आहे. मुंबईहून ही ट्रेन संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सुटणार. सोलापूरहून सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटणार. एकूण 6 तास 35 मिनिटांचा प्रवास असेल दादर, ठाणे, लोणावळा,पुणे, कुर्डुवाडी इथं थांबे देण्यात आलेत.

असं असेल तिकीट?

तिकीट दरांचा जर विचार केला तर, मुंबई ते साईनगर शिर्डीपर्यंत चेअरकारचं तिकीट 840 रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 1,670 रुपये आहे. मुंबई ते सोलापूरपर्यंत चेअरकारचं तिकीट आहे 1110 रुपये. तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2015 रु. मोजावे लागणार. वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल देताच, मोदींनी मराठीतून भाषणाची सुरवात केली.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रात रेल्वेसाठी 13 हजार 500 कोटी देण्यात आलेत. त्याचाच उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणातूनमोदींचे आभारही मानले. तर महाविकास आघाडीचं सरकार असताना मोदींनी महाराष्ट्राशी वैर घेतलं होतं, अशी टीका राऊतांनी केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. मोदी महिन्याभरातच दुसऱ्यांदा मुंबईत आलेत. त्यामुळं राजकीय दृष्ट्याही या दौऱ्याकडे जरा वेगळ्या अँगलनं पाहिलं जातंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी लागू शकतात.

मेट्रो 2 ए, आणि मेट्रोचं उद्घाटन असो की आता मुंबईतून 2 नव्या वंदे भारत ट्रेन्स, याकडे बीएमसी निवडणुकांचा एक भाग म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं मोदींनी कितीही मुक्काम केला तरी शिवसेनाच जिंकेल अशी टीका राऊतांनी केलीय. पंतप्रधान मोदींनी अंधेरीत बोहरा मुस्लिम समाजाच्या सैफी संकुलाचं उद्घाटनही केलं. त्यामुळं मोदींच्या ही हजरीसुद्धा चर्चेचा विषय ठरलीय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.