AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulwama Attack LIVE: नालासोपाऱ्यात 5 तासापासून रेलरोको, पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Attack) तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबईजवळच्या नालासोपारा (Nallasopara) इथं संतप्त नागरिकांनी पाच तासापासून रेल्वे रोखून निषेध व्यक्त केला. त्यामुळे संतप्त नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज करुन रेल्वेट्रॅकवरुन बाजूला केलं. जवळपास दहा हजाराच्या जमावाने थेट पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेल्वे रोखली. एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने जाऊ दिली नाही. खून का […]

Pulwama Attack LIVE: नालासोपाऱ्यात 5 तासापासून रेलरोको, पोलिसांचा लाठीचार्ज
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Attack) तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबईजवळच्या नालासोपारा (Nallasopara) इथं संतप्त नागरिकांनी पाच तासापासून रेल्वे रोखून निषेध व्यक्त केला. त्यामुळे संतप्त नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज करुन रेल्वेट्रॅकवरुन बाजूला केलं. जवळपास दहा हजाराच्या जमावाने थेट पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेल्वे रोखली. एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने जाऊ दिली नाही. खून का बदला खून अशी मागणी करत, पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची मागणी हे संतप्त नागरिक करत होते. सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वे रोखण्यात आली. पोलिसांनी संतप्त नागिरकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिक उतरत होते. हळूहळू नागरिकांची संख्या वाढली आणि संतप्त जमावाचा उद्रेक होऊ लागला. जवळपास दहा हजार नागरिक नालासोपारा रेल्वेट्रॅकवर जमल्याचा अंदाज पोलिसांनीच व्यक्त केला. नागरिक रेल्वे ट्रॅकवरुन हटत नसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सुमारे दीडच्या सुमारास लोकल धावली.

सध्या दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात रिक्षा आणि बस पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सर्व प्रवासी रेल्वे स्टेशनवर अडकून राहिले. पुढे वाचा – 

जमाव हाताबाहेर जात असल्याचं पाहून दुपारी एकच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज करुन संतप्त नागरिकांना रेल्वेट्रॅकच्या बाहेर काढले. यावेळी मोठी धावपळ झाली. या झटापटीत डीवायएसपी सुजाता पाटील किरकोळ जखमी झाल्या.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर नागरिकांनीही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे.  (पुढे वाचा – )

नालासोपारा रेल्वे स्टेशनवर नेमकं काय झालं?

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकाळी 8 च्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मोजकेच आंदोलक होते. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानला धडा शिकवा, भारत माता की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास चाकरमानी नोकरीवर जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्टेशनवर येत होते. हळूहळू काही लोक या आंदोलकांमध्ये जाऊन मिळू लागले. आंदोलकांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे आंदोलकांनी थेट ट्रॅकवर उतरून त्यांनी रेल्वे रोखून धरली. सकाळी 8 च्या सुमारास रेल्वे रोखल्यानंतर स्टेशनवरील गर्दी वाढत गेली.

रेल्वेच पुढे जाऊ न दिल्याने स्टेशनवरील गर्दी तुफान वाढली. त्यातच घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाच्या घोषणा चालूच राहिल्या. दुपारी एकच्या सुमारास जवळपास दहा हजरांवर जमावाची संख्या पोहोचली. जमाव हळूहळू हाताबाहेर जाऊ लागला. तसंच ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवाशीही अडकून पडले. कुणाला नोकरीला, कुणाला खासगी कार्यक्रमांना, कुणाला लग्नाला, कुणाला रुग्णालयात जायचं होतं. मात्र रेल्वे रोखल्यामुळे सर्वकाही ठप्प होतं. दरम्यान जमाव हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत, आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

जवळपास दहा हजाराच्या जमावावर पोलिसांनी हल्ला चढवला. पोलिसांनी कुमक वाढवून जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठपासून दुपारी दीडपर्यंत हा सर्व थरार रंगला. दुपारी दीडनंतर पहिली लोकल धावली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.