AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police News : ‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द!’ पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषदेत माहिती

Maharashtra Police News : पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Police News : 'पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द!' पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषदेत माहिती
रजनीश सेठ, पोलिस महासंचालकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई : राज्यातील सर्व पोलिसांसाठी महत्त्वाची बातमी (Police News) आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील (Maharashtra Police Department) सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या असल्याचं म्हटलंय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात 87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पोलीस महासंचलक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडींवर वक्तव्यही केलंय.

राज ठाकरेंच्या भाषणावर काय म्हणाले?

कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांत रजनीश सेठ यांनी कडक इशारा दिला आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तब्बल 15 हजार लोकांवर कारवाई केली असून 149ची नोटीस १३ हजार लोकांना देण्यातील आली, अशी माहिती त्यांनी दिला.

कारवाई आजच!

दरम्यान, याचवेळी पुढे बोलताना त्यांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याचं म्हटलंय. पोलिसांच्या सात तुकड्या तैनात असून कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल, असं रजनीश सेठ यांनी म्हटलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज ठाकरेंना नोटीस पाठवली की नाही, याबाबत माहीत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. हा विषय पोलीस आयुक्तांकडे असल्यांचं त्यांनी म्हटलंय. मात्र आजच (3 मे) यावर कारवाई होईल आणि औरंगाबादेत पोलीस आयुक्त यावर निर्णय घेतली असंही ते म्हणालेत.

पाहा व्हिडीओ :

कोण आहे पोलीस महासंचालक रजनीश सेठ?

  1. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
  2. 29 डिसेंम्बर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म
  3. 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती
  4. बी ए ऑनर्स (एल एल बी) शिक्षण
  5. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त
  6. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.
  7. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही जबाबदारी संभाळलेली आहे.
  8. राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम
  9. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदीही नियुक्ती
  10. शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.