AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar : अवघ्या 17व्या वर्षी महाविद्यालयीन निवडणूक ते कॅबिनेट मंत्रीपद; वाचा, सुधीर मुनगंटीवारांची राजकीय कारकीर्द

वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले.

Sudhir Mungantiwar : अवघ्या 17व्या वर्षी महाविद्यालयीन निवडणूक ते कॅबिनेट मंत्रीपद; वाचा, सुधीर मुनगंटीवारांची राजकीय कारकीर्द
शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला होणार सुरुवातImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 09, 2022 | 12:07 PM
Share

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाच्या मागील सरकारमध्ये (2014-19) ते अर्थमंत्री होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. छात्रसंघाचे सरचिटणीस ते राज्याचे अर्थमंत्री (Finance minister), अशी झेप त्यांनी घेतली. अभ्यासू, हजरजबाबी आणि उत्कृष्ट वक्ते असलेल्या मुनगंटीवार यांची राजकीय कारकिर्द नेमकी कशी आहे, पाहू या… सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे 1981मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे (BJP) चिटणीस झाले.

  1. विधानसभेची पहिली निवडणूक – मुनंगटीवार यांनी 1995मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी ते 55 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील झाले. समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी. एल. नार्देकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात त्यांचे योगदान आहे. 2009 ते 2013पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते.
  2. राजकारण आणि समाजकारण – गोरगरिबांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने यावा म्हणून त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूरमध्ये वाचनालय आणि माहिती व मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. संस्थेच्या माध्यमातून अपंग मार्गदर्शन मेळावे, बचतगट महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस, मुल, चिचपल्ली, धाबा येथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू केल्या. रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपक्रमही त्यांनी राबविले.
  3. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीत वाटा – जर आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करू शकलो नाही, तर पुन्हा निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी बल्लारपूर तालुका होण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि अखेरीस 1999मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली.
  4. गोंडवाना विद्यापीठासंदर्भातील लढा – त्यांच्या प्रयत्नानंतर क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोग स्थापन झाला. तसेच स्वतंत्र खनिज विकास मंत्रालयाची निर्मितीही त्याच्या प्रयत्नांना आलेले यश आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेरीस या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली.
  5. विदर्भातील भाजपाचा चेहरा – सुधीर मुनगंटीवार हे जवळपास 6 वेळा आमदार राहिले आहेत. ते भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपाचा विदर्भातला महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जवळचे नेते म्हणूनही मुनगंटीवारांची ओळख राहिली आहे.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका