दावे, प्रतिदावे, डिवचणं आणि प्रत्युत्तर, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या चांगलीच शाब्दिक चकमक सुरु आहे. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस हे 1978 मध्ये प्राथमिक शाळेत शिकत होते, असा टोला लगावला. त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.

दावे, प्रतिदावे, डिवचणं आणि प्रत्युत्तर, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 5:56 PM

मुंबई : भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरुन हा मुद्दा सुरु झालाय. शरद पवार यांनी 1977 मध्ये माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाला 40 आमदारांसह पाठिंबा काढला होता. त्याच घटनेचा दाखला देत फडणवीस यांनी टीका केली. त्यावर शरद पवार यांनी फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती नाही, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

“शरद पवार म्हणाले ते खरं आहे. मी 1977 मध्ये प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी त्यांना ते अस्वस्थ करणारं होतं म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. “मी कुठेही शरद पवार यांनी बेईमानी केली, असं म्हटलं नाही. ते भाजपसोबत आले नाही, असंही मी म्हटलं नाही. उलट ते भाजपसोबत आले हे मीच सांगितलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचं पवारांना प्रत्युत्तर काय?

“मी काय म्हटलं होतं, शरद पवार यांनी 1978 मध्ये वसंत दादा पाटील यांच्यासोबत ते मंत्री होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातील 40 लोकं बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे हे तर आमच्यासोबत निवडून आले होते. ते तिथून 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केलं”, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो…’

“मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो, पण इतिहास बदलत नाही. कुणी जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं, यावर इतिहास ठरत नसतं. इतिहासात लिहून ठेवलं आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंत दादा पाटलांचं सरकार पाडलं. ते बाहेर पडले आणि जनसंघ म्हणजे भाजपसोबत त्यांनी सरकार तयार केलं. मी तेच सांगितलं”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरता ओबीसी लागतात. प्रमुख संविधानिक पदे आली की त्यांना ओबीसींचा विसर पडतो हेच आपल्या लक्षात आलेलं आहे. हे मी म्हणतो असं नाहीय. त्यांच्या पक्षातूनच मागणी आलीय की, ओबीसी नेत्याला अध्यक्ष करा. खरं म्हणजे त्यांच्या पक्षातील नेते दबक्या आवाजात जे बोलतात तेच मी अभिव्यक्त केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणाचा बोलबोला आहे. त्यांच्या पक्षाचे नेते जे खासगीत बोलातात ते मी जाहीरपणे बोललो”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस आधी काय म्हणाले होते?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1978 साली वसंतराव पाटील यांच्या मंत्रिमंडळात असताना 40 जणांना घेऊन बाहेर पडले. तेव्हाच्या भाजप पक्षासोबत सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्ष चाललं. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्ष चाललं असतं. शरद पवार यांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि एकनाथ सिंदे यांनी केलं तर बेईमानी, असं कसं चालेल?” असं देवेंद्र फडणवीस आधी म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांचं नेमकं प्रत्युत्तर काय?

“आम्ही 1977 साली सरकार बनवलं. त्यामध्ये भाजप माझ्याबरोबर होती. उत्तमराव पाटील, ही लहान मुलंही होती त्या वेळेला. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी जे सरकार बनवलं ते सर्वांना घेऊन केलं. त्याच्यामध्ये त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर अडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. पण माझ्या मते हे प्राथमिक शाळेत असतील त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल”, असं शरद पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.