AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन अभिनेत्री, ‘कपडे’ आणि ‘दारु’, राजकारणात हंगामा, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेमुळं वादात भर पडलीय. थर्टी फर्स्टला शुभेच्छा देताना केतकीनं वादग्रस्त पोस्ट केली. तर उर्फी जावेदनं चित्रा वाघांना पुन्हा डिवचलंय.

दोन अभिनेत्री, 'कपडे' आणि 'दारु', राजकारणात हंगामा, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Jan 03, 2023 | 11:21 PM
Share

मुंबई : मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन वाद निर्माण झाला असताना आता, अभिनेत्री केतकी चितळेच्या एका व्हिडीओवरुन आणखी भर पडलीय. आणि त्यावरुनही राजकीय पडसादही सुरु झालेत. थर्टी फर्स्टला शुभेच्छा देताना हातात दारु किंवा वाईनचा ग्लास घेऊन केतकीनं, वादग्रस्त पोस्ट केलीय. आणि हा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट करताना, केतकीनं म्हटलंय की, फादर, त्यांना माफ करा. कारण त्यांना माहित नाही ते काय करतायत. मी काही चुकीचं बोलत असेल तर नक्कीच मला सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ. लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है. माझा तिरस्कार करणाऱ्या सगळ्यांना माफ करा.

यानंतर प्रितम नावाच्या एका व्यक्तीनं केतकीला सवाल केलाय. वाह दीदी, लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं. त्यानंतर केतकीनं यावर रिप्लाय केला.

मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका ?. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारु आहे. आमचे देवही दारु पितात. काली मातेला तर दारुचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका, असा रिप्लाय केतकी चितळेने दिला.

तर इकडे उर्फी जावेदनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलंय. जर मी भाजपमध्ये प्रवेश केला तर चित्रा वाघ यांच्याशी घट्ट मैत्री होईल. चित्राजी, संजय राठोड प्रकरण आठवा. तुम्ही भाजपमध्ये येताच त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांच्या सर्व चुका विसरलात. राष्ट्रवादीत असताना एवढा हल्लाबोल केला होता, असं उर्फी म्हणाली.

विशेष म्हणजे, चित्रा वाघांनी थोबाड रंगवण्याची भाषा केल्यानंतर, उर्फी हे ट्विट केलंय. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनीही, उर्फी जावेदचा समाचार घेतलाय. व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर असल्याची टीका पेडणेकरांनी केलाय.

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत असल्याचा आरोप उर्फी जावेदवर आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसात रितसर तक्रार देऊन, कारवाईची मागणीही केलीय.

चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर पोलीस खरंच कारवाई करतात का? हे कळेल. पण वाघ यांनी टार्गेट केल्यानंतर, उर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांना डिवचणं सुरुच ठेवलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.