Prakash Ambedkar: काँग्रेसला वारंवार समजावलं की मुसलमानांची मतं… प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, राष्ट्रीय पक्षाची हाराकिरी…

Prakash Ambedkar Big Statement : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. काँग्रेस पक्षाला समजावूनही त्यांनी कोणती चूक केली यावर आंबेडकरांनी मोठा प्रकाश टाकला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या हाराकिरीचे एक कारण त्यांनी समोर आणले आहे. काय म्हणाले आंबेडकर...

Prakash Ambedkar: काँग्रेसला वारंवार समजावलं की मुसलमानांची मतं... प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, राष्ट्रीय पक्षाची हाराकिरी...
प्रकाश आंबेडकर, काँग्रेस
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 20, 2026 | 12:10 PM

Prakash Ambedkar Big Statement : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. बीएमसी निवडणुकीत काँग्रेसने 24 जागा जिंकल्या. त्यावेळी आंबेडकराचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आले आहे. मुंबईत आम्ही वारंवार काँग्रेसला सांगितले की तुम्ही मुस्लिमांची मतं ही आपली जहांगीर असल्यासारखे वागू नका. निवडणूक निकालानंतर ही बाब स्पष्ट झाली. मुसलमानांनी काँग्रेसची साथ सोडली. हिंदू मतदार तर अगोदरच काँग्रेसपासून दुरावला आहे. काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांच्या बळावर आणि त्यांच्या प्रतिभेवर निवडून आल्याचा आंबेडकरांनी दावा केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट

आम्ही वारंवार काँग्रेसला सांगत होतो की एक मोठी सभा घ्या. पण त्यांनी आमचे काहीएक ऐकले नाही. जनसभेतून एक मोठा मेसेज गेला असता आणि आघाडीला फायदा झाला असता. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची एकच जागा निवडून आली आहे. ज्या जागांसाठी त्यांनी आमच्याशी वाद घातला, तिथे त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली. जर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर ते आमच्यासोबत असते तर जवळपास 40 ते 42 जागा निवडून आल्या असत्या आणि त्यातील 19-20 नगरसेवक आमचे असते. तर तितकेच काँग्रेसची असते, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली आहे. या महापालिकेत एकूण 115 जागा आहेत. येथे भाजपने 58 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, उद्धव सेनेला 6, मनसेला एक तर असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM या पक्षाने 33 जागा मिळवत सर्वांनाच मोठा धक्का दिला. तर इतरांच्या खात्यात केवळ चार जागा गेल्या. काँग्रेसच्या खात्यातील अनेक जागांवर एमआयएम आणि भाजपने मोठी मुसंडी मारली. वंचितला ही मोठी मजल मारता आली नाही. काँग्रेस आणि वंचित सोबत आले असते तर कदाचित एमआयएमला टफ फाईट मिळाली असती.

भाजपचा इतर पक्षांवर पण ताबा

प्रकाश आंबेडकर यांनी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीविषयी मोठे वक्तव्य केले आहे. जिल्हा परिषद निवडणुका आम्ही व्यापक स्तरावर लढत आहोत. आता काँग्रेस आमच्यासोबत असेल अशी आमची आशा आहे. करारानुसार आम्ही दोन्ही पक्ष मिळून निवडणुकीला सामोरं जाऊ. इतर पक्षात भाजपनं घुसखोरी केली आहे. त्यामुळे भाजपचे इतर पक्षांवर नियंत्रण असल्याचा त्यांनी दावा केला. वंचितने राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे.