AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : शासनाकडून ओबीसींना फसवण्याचं कारस्थान; सरकारचा अहवाल थातूरमाथूर; प्रकाश आंबेडकरांची टीका

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितली आहे ती जोपर्यंत सादर केली जाणार नाही,तो पर्यंत सुप्रीम कोर्ट स्थगिती हटावणार नाही अशीही प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

OBC Reservation : शासनाकडून ओबीसींना फसवण्याचं कारस्थान; सरकारचा अहवाल थातूरमाथूर; प्रकाश आंबेडकरांची टीका
ओबीसींना फसवण्याचं कारस्थान शासनाकडून सुरुःप्रकाश आंबेडकर Image Credit source: TV9
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 21, 2022 | 4:17 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र शासनाने ओबीसींना (OBC) फसवण्याचं कारस्थान सुरु केलं आहे. जुनं मागासवर्गीय आयोग (Backward Classes Commission) संपवून नवीन आयोग स्थापीत करण्यात आले आहे. तरकोर्टाने जो इम्परिकल डेटा मागविण्यात आला होता, तो एकंदरीत 18 मुद्यांवर आला पाहिजे होता, मात्र, मागचा अहवाल थातूर माथूर होता अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Ad. Prakash Ambedkar) यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ओबीसी जागांच्या मुद्यांबाबत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितली आहे ती जोपर्यंत सादर केली जाणार नाही,तो पर्यंत सुप्रीम कोर्ट स्थगिती हटावणार नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी नव्या आयोगाविषयी बोलताना सांगितले की, नव्या आयोगाच जे नोटिफिकेशन आले आहे, त्यामध्ये समाज न्याय संघटना ज्या आहेत, त्यांच्याकडून आयोगाला माहिती देण्यात आली पाहिजे, आणि ती माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींच्या जागा किती

जो अहवाल 18 मुद्यांवर येणे अपेक्षित होते, त्या अठरा मुद्यांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींच्या जागा किती?, त्या भरल्या की न भरल्या त्याच्या पैकी क्रिमिलियर नॉन क्रिमिलियलमध्ये पडतात हे पाहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागास समाजाचा विचार

एखादा समाज 10 लाखाच्या संख्येत येत असतो तेव्हा तो समाज मागास समाज म्हणून गणला जातो का याचाही विचार केला गेला पाहिजे असेही मत त्यांनी सांगितले.

फसवा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर

सुप्रीम कोर्टाकडून जी नवीन माहिती माविण्यात आली होती, त्यामध्ये नवीन समूहाचे किती प्रतिनिधी आहेत, याची अधिक माहितीही न्यायालयाकडून मागविण्यात आली होती. ज्या प्रकारे नव्या आयोगाच्या नोटिफिकेशमध्ये काही मुद्दे मांडण्यात आले आहे, त्यामध्ये एकही मुद्दा त्यासंदर्भात उपस्थित केला गेला नाही. त्यामध्ये एकही मुद्दा टाकण्यात आला नाही या कारणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा फसवा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आला असल्याची टीकाही त्यांनी केली. आयोगाच्या अहवालाबाबत आणि त्यांच्या कार्याबद्दलही प्रकाश आंबेडकर यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादीत चाललंय काय? अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्याला जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दिलखुलास दाद, त्यावर राष्ट्रवादीचाच नेता म्हणतो, माफी माग

Pune NCP Vs Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा; ‘राष्ट्रवादी’ची पुण्यातल्या शिवाजीनगर पोलिसांत धाव

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!