आम्ही 288 उमेदवार देणार, सरकारचे आमदार पाडणार अन्…; ‘या’ नेत्याचा इशारा
Prakash Shendge on Maharashtra Vidhansabha Election 2024 : यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावरून आता पक्ष आणि संघटना अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

आम्हाला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शब्द दिला आहे. ओबीसीला धक्का लागणार नाही. उद्धव ठाकरे- शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, काँग्रेस सर्वांनी सांगितलं आहे. घटनेने त्यांना अधिकार दिला आहे. निवडणुकीला उमेदवार उभे करायचे आहेत. मात्र आरक्षणासाठी उभे करता हे ओबीसीला धोका आहे. सरकारने यांच्या धमकीला बळी पडत ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही. आम्ही देखील 288 उमेदवार उभे करणार आहोत आणि सरकारचे आमदार पाडू आणि त्यांना राजकीय बेरोजगार करणार आहोत. संख्या गणित ओबीसींच्या बाजूने आहे, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
आरक्षण प्रश्नावर काय म्हणाले?
त्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली का नाही हा आमचा विषय नाही तो प्रशासनाचा विषय आहे. त्यांनी नवीन मागणी आता केलीय, कुणबी आणि मराठा एकच असं…. शासनाने जी अधिसूचना काढली त्याला 10 लाखाहून अधिक हरकती आल्या आहे. आमच्या ओबिसिनी अतिशय त्वेषाने हरकती घेतल्या. हा विरोध कायम राहील. आरक्षण दिले तर अक्षरश: गरीब समाजाच्या आरक्षणावर दरोडा टाकण्याच्या काम होईल, असं ते म्हणाले.
धनदांडग्या समाजाच्या मागणीला बळी पडणार असाल तर ओबीसींचा विरोध आहे. ओबीसी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नये. सोमवारी यासंदर्भात बैठक आहे. आमचं आरक्षण कस वाचवायचं या संदर्भात रणनीती ठरणार आहे, असंही शेंडगे म्हणाले आहेत.
तायवडे काय म्हणाले?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही आंदोलनावर भाष्य केलंय. आंदोलन करताना आता पुन्हा आंदोलन सुरू केला आहे. आत्ताच्या आत्ता ड्रॉप काढा, असं म्हणत असेल तर ते शक्य नाहीये. सरकारने लवकर काढावा. यात आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. आंदोलन कर्त्यांनी ठरवायला पाहिजे. केव्हा आंदोलन करायला पाहिजे. त्यांना योग्य वाटला असेल तर त्यांनी भूमिका घेतली. त्यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा मात्र यात समाजाचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. एवढेच निवेदन मी सुद्धा करतो, असं तायवडे म्हणाले.
