NCP: सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर नाराज, मॅरेथॉन बैठकीनंतर दादांच्या राष्ट्रवादीत लवकरच मोठा भूकंप?

Prashant Kishor Meets Sunetra Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेल्या दोन दिवसात मोठे बदल दिसले. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली. नवीन नियुक्ती करण्यात आली. तर त्याचवेळी अजून मोठ्या घडामोडींची नांदीही स्पष्टपणे दिसत आहे. देवगिरी बंगला राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.

NCP: सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रशांत किशोर नाराज, मॅरेथॉन बैठकीनंतर दादांच्या राष्ट्रवादीत लवकरच मोठा भूकंप?
प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे
| Updated on: Aug 07, 2026 | 11:05 AM

अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. दादांच्या राष्ट्रवादीत दोन दिवसात अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. नवीन चेहरे समोर आल आहेत. त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. बिहारमधील विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रणनीतीकार प्रशांत किशोर हे राज्यात दाखल झाले आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरीवर बैठक घेतली. सहा तास मॅरेथॉन बैठक झाली. यावेळी पार्थ पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत येत्या काही दिवसात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनील तटकरे यांच्या कामावर नाराजी

प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार पार्थ पवारांच्या बैठकीतील माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बैठकीत सुतोवाच करण्यात आले. जोपर्यंत राज्यातील नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणे कठीण असल्याचं प्रशांत किशोर यांनी मत व्यक्त केलं. यापूर्वी झालेल्या ३ बैठकांमधे याबाबत सांगून देखील बदल होतं नसतील तर काम करणे कठीण असल्याचं किशोर यांचं मत आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

भविष्यातील निवडणुकांसाठी आपण काम करण अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी प्रशांत किशोर यांनी बैठकीत भूमिका मांडली. बैठकीला प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीम मधील २ सदस्य उपस्थित होते. बैठकीत जय पवार देखील ऑनलाइन सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सहा तास महामॅरेथॉन बैठक

प्रशांत किशोरांशी चर्चा सहा तास चाललेल्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या राज्य संघटनेत आमूलाग्र बदल करण्यासह राज्य नेतृत्व बदलण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पक्षनेतृत्व बदलाची शिफारस केली. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली.

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर तीन दिवसांनी जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली. या वेळी त्यांनी पक्षाचे राज्यातील नेतृत्व बदलण्याची शिफारस केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सुमारे सहा तास चाललेल्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या राज्य संघटनेत आमूलाग्र बदल करण्यासह राज्य नेतृत्व बदलण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभा सदस्य पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर हे बुधवारी रात्री विशेष विमानाने दिल्लीहून मुंबईत दाखल झाले.

भविष्यातही मार्गदर्शन करणार

‘गुंगी गुडिया’ या टीकेबाबतही बैठकीत चर्चा झाली. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर देत घटनात्मक कामावर लक्ष देणे, हे त्यावरील उत्तर असल्याचे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. पवार कुटुंबाशी त्यांचा संपर्क कायम असून, भविष्यातही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

पक्षात लवकरच मोठे फेरबदल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राज्यभर सर्व्हेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रशांत किशोर लवकरच सर्व्हेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर करणार आहेत. अहवाल आल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून विविध पक्षीय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us