AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: … मग विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत राज ठाकरे यांचा थेट सवाल

Raj Thackeray on Education System: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांनी राग व्यक्त केला तर चुकले कुठे असा सवाल केला.

Raj Thackeray: ... मग विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत राज ठाकरे यांचा थेट सवाल
राज ठाकरे, शिक्षण पद्धत
| Updated on: Aug 07, 2026 | 10:38 AM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असतानाही पेपर फुटले याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजपमधील अंतर्गत भांडण यानिमित्ताने बाहेर आले

शिक्षणातील या गोष्टी आहेत, बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन झालं. प्रत्येक आईवडिलांचा मुलगा नीटला नव्हता. सर्वच विद्यार्थी नीटचे नव्हते. पण तरुणांच्या मनातील राग होता. सभोवतालचा राग होता. या पुढे अजून जोरात येईल. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. पण सरकारबद्दलचा राग अशा प्रकारचा बाहेर येतो. आंदोलन घराघरात शिरलं. तरुणांना मारलं. माझ्या मुलाला मारलं प्रत्येक आईवडिलांना वाटलं. शांततेत आंदोलन सुरू होतं. सरकारने या सर्व गोष्टींची सुरुवात केली. भाजपमधील अंतर्गत भांडण आहे. त्या गोष्टी चव्हाट्यावर येतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती

मुलं आठ आठ तास क्लासमध्ये बसत आहे. मग कॉलेज काय करतंय. कोचिंग क्लास सर्वच वाईट आहे असं नाही. पण आता धंदा म्हणून जे आले, नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले. आतापर्यंतचे पेपर कोचिंग क्लासवाल्यांनीच फोडले ना. नीलकनींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे. क्लास ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलसेजला जायचं. चंद्रकांत पाटील, सीएमने यावर लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजची फी २० हजार रुपये. क्लासची फी लाख रुपये. क्लासमध्ये अटेंडन्स लावल्यावर कॉलेजला अटेन्डन्स कसा लागतो. ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती आहे. कॉलेजवाल्याला पैसे मिळाले असणार, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मग विद्यार्थ्यांनी चिडू नये का?

२१ मुलांनी आत्महत्या केली. त्यात यश गोसावीचं नाव आहे. पालकमंत्री आहेत नाही माहीत नाही. नाशिकचा मुलगा नीटची तयारी करतो. पेपपर फुटल्यावर आत्महत्या करतो. २१ मुलांची नावे येतात. २२ वं नाव देता येत नाही? हे कोणतं सरकार सुरू आहे? काय चालू आहे? आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलन होत आहे. या शिक्षण पद्धतीला गांभीर्याने घेत नसाल आणि विद्यार्थ्यांनी चिडू नये असं म्हणत असाल, तर कसे चालेल असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...