AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर

लसीकरणामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला. (Pravin Darekar On Corona ‘massive’ vaccination drive)

लसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर
| Updated on: Jan 16, 2021 | 7:27 PM
Share

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केला. यानंतर मुंबई शहरात महापालिकेच्यावतीनं लसीकरणाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज कांदिवली पश्चिम येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेच्या ठिकाणी भेट दिली. या लसीकरणामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला. (Pravin Darekar On Corona ‘massive’ vaccination drive)

राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दा असलेले पालिका कर्मचारी, रूग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. आजपासून कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात मोफत लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. याची महापालिकेकडून उत्तम सोय करण्यात आली आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

रुग्णालयाचे अधिष्ठाता किंवा सहाय्यक आयुक्त कुराडे यानी एक चांगली यंत्रणा राबवली आहे. लसीकरण रूग्णालयात तपासणी केंद्र, नोंदणी केंद्र, प्रतिक्षा कक्ष यांची सर्व ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचे उत्तम नियोजन केल्याबद्दल व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांचे दरेकरांनी कौतुक केले.

या लसीकरणामुळे मंबईकर जनतेच्या मनात एक प्रकारची भीती होती ती जाऊन आता पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आता विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

(Pravin Darekar On Corona ‘massive’ vaccination drive)

संबंधित बातम्या : 

Corona Vaccination live : कोरोना लसीकरणात राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...