AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर महात्मा गांधींनीही तुम्हाला फासावर लटकवले असते, प्रवीण दरेकरांचा घणाघात

तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? बाळासाहेबांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नाही. बॉम्बस्फोटात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यांना त्याचीही लाज वाटत नाही.

तर महात्मा गांधींनीही तुम्हाला फासावर लटकवले असते, प्रवीण दरेकरांचा घणाघात
bjp morchaImage Credit source: tv9 marathi
Updated on: Mar 09, 2022 | 1:54 PM
Share

मुंबई: गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी कसे घालू शकता? तुमचा ठाकरी बाणा कुठे आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे, असं सांगतानाच देशद्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे नेते आंदोलन करतात. गृहमंत्रीही या पुतळ्याखाली आंदोलनाला बसतात. त्या ठिकाणी महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, असा घणाघाती हल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी चढवला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आज विराट मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. यावेळी मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी हजारो लोक मोर्चात सामिल झाले होते.

तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? बाळासाहेबांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नाही. बॉम्बस्फोटात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यांना त्याचीही लाज वाटत नाही. पण आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठीच आज लाखोंचा जनसागर लोटलाय. देशद्र्योसाठी सरकारमधील नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात. गृहमंत्रीही बसतात. आज गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, असा घणाघाती हल्ला प्रवीण दरेकर यांनी चढवला आहे.

फडणवीसांना कोणीच संपवू शकत नाही

न्यायालय सजा देते, शिक्षा देते आणि तुम्ही आमच्या नेत्यांवर आरोप करता? काल देवेंद्रजींनी तुमचे कपडे उतरवले. देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा कट सुरू आहे. तुमचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलं. पुराव्यासहीत उघड केलं. फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही. फडणवीस या प्रवृत्ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं. सत्तेला लाथ मारून बाळासाहेबांचा कित्ता, ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी गिरवावा. जनतेचा एल्गार, संताप एवढा मोठा आहे की तुमचं सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

VIDEO: एकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवली

दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update : आक्रोश आणि व्यथा मांडणार मोर्चा आहे – अशिष शेलार

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.