VIDEO: एकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे.

VIDEO: एकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवली
देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 1:19 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून पुन्हा एकदा भाजपवर (bjp) हल्ला चढवला आहे. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल 90 छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे, असं शरद पवार म्हणाले. एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे, अशी खंत व्यक्त करतानाच कोणत्या यंत्रणेने अनिल देशमुखांच्या घरी किती छापे मारले आणि कुणा कुणावर छापे मारले याची यादीच वाचून दाखवली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काही आरोप केले. त्याचे पुरावेही त्यांनी सादर केले. एका पेन ड्राईव्हत काही व्हिडीओ पुरावे आहेत, ते त्यांनी दिले. या व्हिडीओत संबंधित व्यक्तीने माझाही उल्लेख केला आहे. पण व्यक्तिश: या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे ही आमची तक्रार आहे, असं शरद पवार म्हणाले.

देशमुख प्रकरणात 200 लोकांची चौकशी

उदाहरणच द्यायचं झालं तर अनिल देशमुखाचं देता येईल. एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांची तक्रार केली. त्यामुळे देशमुखांना तुरुंगात जावं लागलं. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. देशमुख यांना तुरुंगात टाकल्यानंतर चौकशी कशा पद्धतीने किती वेळा केली जाते. सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे. देशमुख यांचे कुटुंब, नातेवाईक, चार्टड अकाऊंट, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी अशा 95 लोकांवर रेड झाल्या. 200 लोकांना बोलावून चौकशी केली. ईडीने 50, सीबीआयने 20 आणि इन्कम टॅक्सने 20 छापे मारले. असे 90 छापे एका व्यक्तीच्या घरी मारण्यात आले. 90 मारण्याचा प्रकार मी पाहिल्यांदाच पाहिला आहे. असं मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. एवढे छापे पाडून काही हाती लागत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे, असा दावा पवार यांनी केला.

कुणी किती छापे मारले?

ईडी- 50 सीबीआय- 20 इन्कम टॅक्स- 20

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे, त्यामुळे पंतप्रधान देखील याची खोलात जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सर्वांचाच ईडीच्या कारवायांना विरोध आहे. राऊतांनी जी भूमिका घेतली आहे. ती आमच्या विचाराशी सुसंगत आहे, असं सांगतानाच सध्या महाराष्ट्रात एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये धाडी टाकल्या जात आहेत. इथे काही गोष्टी झाल्यावर आमच्याकडेही घडतं असं मला पश्चिम बंगालमधील लोकांनी फोन करून सांगितलं. आपण या प्रकरणी लढा देऊ असंही त्यांनी म्हटल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

VIDEO: नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपच्या मोर्चाआधीच शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra News Live Update : नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.