राज ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात; 3 तारखेच्या अल्टीमेटमवर मनसे ठाम – नांदगावकर   

एक मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात; 3 तारखेच्या अल्टीमेटमवर मनसे ठाम - नांदगावकर   
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:39 AM

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची येत्या एक मे रोजी औरंगाबादेत (Aurangabad) सभा होणार आहे. ही सभा सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. सभेला पोलीस परवानगी देणार का याबाबत देखील शंका होती. अखेर राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला परवानगी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. एक मे रोजी राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची तयारी पूर्ण झाली असून, रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मागचा गर्दीचा सर्व रेकॉर्ड तोडणारी ही सभा असेल असे  मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हटले आहे. तयारी अंतिम टप्प्यात असून, उद्या राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होणार असल्याची माहिती देखील यावेळी नांदगावकर यांनी दिली आहे.

काय म्हणाले नांदगावकर?

राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही सभा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मागील सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल. उद्या राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. ते उद्या मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये देखील सभेचा उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान त्यापूर्वी आज अमित ठाकरे देखील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. ते सभा स्थळाची देखील पहाणी करणार आहेत.

3 तारखेच्या अल्टीमेटमवर ठाम

पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की,  राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा हाती घेतला आहे. हा सामाजिक मुद्दा आहे. राज ठाकरेंची भूमिका ही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी नसते. मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी तीन मेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. तीन तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत अशी मागणी देखील यावेळी नांदगावकर यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.