कल्याणमधील क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार

कल्याणमधील क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Prisoner run away from quarantine centre in Kalyan).

कल्याणमधील क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार

ठाणे : कोरोनाचा संसर्ग जसा सामान्य नागरिकांना आहे, तसाच तो तुरुंगातील कैद्यांनाही आहे. विशेष म्हणजे बाहेरुन तुरुंगात येणाऱ्या नव्या कैद्यांमुळे तुरुंगातील आधीच्या कैद्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. त्याचाच विचार करुन तुरुंग प्रशासनाने नव्या कैद्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था केली. मात्र, कल्याणमध्ये याच क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Prisoner run away from quarantine centre in Kalyan).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन येणाऱ्या कैद्यांमुळे तुरुंगातील  कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कल्याणमधील आधारवाडी तुरुंग प्रशासनाने देखील यासाठीच नवीन कैद्यांची व्यवस्था तुरुंगाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. कल्याणमधील डॉन बॉस्को शाळेत तुरुंग प्रशासनाने कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे क्वारंटाईन सेंटर तयार केलं होतं. नवीन कैद्यांना याच डॉन बोस्को शाळेत ठेवण्यात आले. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. असं असतानाही या शाळेतून गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले दोन कैदी फरार झाले. मंगळवारी (30 जून) रात्रीच्या सुमारास चक्क हॉलच्या मागील बाजूस असलेले प्लायवूड तोडून ते पसार झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

उमेश जाधव आणि गणेश उर्फ गणपत दराडे अशी या पसार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दोन्ही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील (केडीएमसी) कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 925 वर पोहचली आहे. आज एका दिवसात नव्याने 350 रुग्णांची नोंद झाली, तर 496 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. कल्याणमध्ये आज कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला, एकूण मृत्यूंचा आकडा 123 वर पोहचला आहे. या ठिकाणी सध्या एकूण 3 हजार 917 कोरोना रुग्ण सक्रिय आहे, तर 2 हजार 885 रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा :

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश

उद्धव ठाकरेंना फेल करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

चोरलेले, हरवलेले 2100 मोबाईल पोलिसांनी शोधले, बहुतांश मोबाईल विद्यार्थ्यांकडून हस्तगत

Prisoner run away from quarantine centre in Kalyan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI