AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकची मुलगी असल्याचा अभिमान, सना मलिकचा टोला

अणुशक्तीनगरमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणूक लढवत आहे. तर त्यांच्या विरोधात स्वरा भास्करचा पती फवाद अहमद रिंगणार आहे. त्यामुळे कांटे की टक्कर आहे. फवाद अहमद शरद पवार गटातून निवडणूक लढवत आहे.

अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकची मुलगी असल्याचा अभिमान, सना मलिकचा टोला
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 28, 2024 | 4:46 PM
Share

महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा झाली असून पुढील महिन्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक या अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. यावेळी वडील नवाब मलिक आणि मोठी बहीणही देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक यांच्या विरोधात शरद पवार गटाचे फहाद अहमद निवडणूक लढवत आहेत. फहाद हे आधी समाजवादी पक्षात होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी विद्यार्थी फहाद अहमद यांनी सीएए-एनआरसी आणि एनपीआर सारख्या मुद्द्यांवर आवाज उठवला होता. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी अभिनेत्री स्वरा भास्करसोबत लग्न केले होते.

फहादवर निशाणा साधत असताना सना मलिक म्हणाली की, नवाब मलिकची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. एखाद्या अभिनेत्रीचा नवरा होण्यापेक्षा हे बरे. नवाब मलिकची मुलगी अणुशक्तीनगरची मुलगी होऊ शकते. सना म्हणाली की, तिने या क्षेत्रात काम केले आहे आणि तिच्या रॅलीमध्ये तिला ज्याप्रकारे पाठिंबा मिळाला तो त्याचा पुरावा आहे.

शरद पवार गटाने फहाद यांना उमेदवारी दिल्यावर सना म्हणाले की, हे राजकारण आहे. शत्रू नाही. ते फक्त विरोधक आहेत. सध्या ते प्रतिस्पर्धी आहेत. पॅराशूटने येथे उतरलेल्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबद्दल माझ्याकडे बोलण्यासारखे फारसे काही नाही.

सना मलिक पुढे म्हणाली की, मी फहादबद्दल काही बोलणार नाही पण मी एवढेच सांगेन की, इथले लोकं मला नवाब मलिकची मुलगी म्हणून ओळखतात. पण मी त्यांच्या घरी जाऊन चहा पिते आणि त्यांच्या समस्या ऐकते.’ नवाब मलिक महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप झाले होते. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी भाजप सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करते असा आरोप त्यांनी केला होता. नवाब मलिक हे सध्या अजित पवार गटासोबत आहेत.

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय. त्यानंतर त्यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. अहमद म्हणाले होते की, ही लोकशाही आहे, इथे घराणेशाही चालणार नाही. नवाब मलिक यांनी मतदारसंघात काम केलेले नाही. त्यांची मुलगी सना मलिक यांनी त्यांच्या नावावर निवडणूक लढवावी. फहाद अहमद यापूर्वी समाजवादी पक्षात होते.

Follow Us
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?