AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Interview: शरद पवार जातीवादीच, राज ठाकरे यांनी दिले उदाहरणच…पवारांना थेट आव्हान

Raj Thackeray exclusive Interview: शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या त्याची पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात पाळली नाही. मी जातीवादी राजकारण केले नाही. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.

Raj Thackeray Interview: शरद पवार जातीवादीच, राज ठाकरे यांनी दिले उदाहरणच...पवारांना थेट आव्हान
Raj Thackeray
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 11, 2024 | 5:37 PM
Share

Raj Thackeray exclusive Interview: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला केला. शरद पवार यांनी आपण जातीवादी असल्याचे एक उदाहरण तरी द्या, असे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी उदाहरण दिले. राज ठाकरे म्हणाले, एक उदाहरण सांगतो. सोपे उदाहरण आहे. त्याचे फुटेज सर्वांकडे आहे. भुजबळांना पुण्यात पुणेरी पगडी घातली. पवारांनी ती काढली आणि ज्योतिराव फुल्यांची पगडी घातली. ज्योतिराव फुल्यांची पगडी घालण्याबाबत काही म्हणणे नाही. पण ही घालू नका, ही घाला. ते फुटेज पाहा. सत्काराच्या वेळी हे घडले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले.

शरद पवार यांना आठवत नसेल…आता…

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. त्या शरद पवार यांच्या टीकेवर राज म्हणाले, शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या त्याची पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात पाळली नाही. मी जातीवादी राजकारण केले नाही. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या त्यांना पैसे पुरवायचे या गोष्टी सर्वांना माहीत आहे. काही गोष्टी मला पर्सनली बोलायच्या नाही. नाही तर त्याही बोललो असतो. पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

चांगल्यास चांगले, वाईटाला वाईट

लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आले तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला लाच म्हणेल. मला इतर राजकारण्यांसारखे वागता येत नाही. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार आहे. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. तुमचा स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?