‘कोरोना’ हे तिसरे महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला : रामदास आठवले

| Updated on: May 21, 2020 | 12:45 PM

पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील 190 देश भरडले जात आहेत, असं आठवले म्हणाले. (Ramdas Athawale appeals to boycott China Made items)

कोरोना हे तिसरे महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला : रामदास आठवले
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रसाराचा जगाला धोका पोहोचू नये, यासाठीत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale appeals to boycott China Made items)

चीनने ‘कोरोना’ महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्य वेळी बंद करायला हवे होते. मात्र कोरोनाच्या प्रसाराचा जगाला धोका होऊ नये, याबाबत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

चीनच्या वुहानमधून कोविड19 हा विषाणू जगभर पसरला. कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील 190 देश भरडले जात आहेत, असं आठवले म्हणाले.

हेही वाचा : ‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ

जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे. भारतासह संपूर्ण जगाने चीनने उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

गो कोरोना, कोरोना गो

‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा देतानाचा रामदास आठवलेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनासभेचा हा व्हिडिओ होता. या सभेला उपस्थित असलेले आठवले आपल्या खास शैलीत ‘गो करोना’च्या घोषणा देत होते.

‘गो कोरोना, कोरोना गो, गो गो कोरोना, कोरोना गो’ असा जयघोष त्यांनी आपल्या खुमासदार कवितांच्या शैलीतच केला होता. या व्हिडिओवर सोशल मीडियातून विनोदाचा पाऊस पडला होता. (Ramdas Athawale appeals to boycott China Made items)