AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray यांच्यावर 19 हजार 750 कोटींचा दावा?, नोटिस बजावली; काय आहे प्रकरण?

दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Aaditya Thackeray यांच्यावर 19 हजार 750 कोटींचा दावा?, नोटिस बजावली; काय आहे प्रकरण?
aaditya thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2023 | 2:28 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. राशिद खान यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटिस बजावली आहे. आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा न्यायालीयन प्रक्रियेला सामोरे जावं, असं या याचिकेतून बजावण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राशिद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी. वृत्तपत्रातून त्यांना माफीनामा द्यावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना सीबीआयने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांचं कॅव्हेट

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर कोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सायन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान मागील सुनावणीत आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी कॅव्हेट दाखल केलं होतं. कोर्टाने कोणतेही निर्देश देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मोबाईल तिथे कसा काय?

आदित्य ठाकरे यांनी कोर्टात खोटी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कोर्टाचा अवमान झाला असून आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केली आहे. यावेळी राशिद खान यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सालियनचा मृत्यू झाा त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मोबाईलचं लोकेशन त्या परिसरात कसं काय होतं? असा सवाल यावेळी करण्यात आला आहे. तसेच दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास अजून संपलेला नसल्याचंही याचिकेत म्हटलं आहे.

ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!.
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद.
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ.