रतन टाटा यांचे बंधू जिमी, दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात…मोबाईलसुद्धा वापरत नाही…

Who is Ratan Tata brother: जिमी टाटा साधे राहत असले तरी त्यांच्याकडे संपत्ती खूप आहे. ते टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा सन्स, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (टीसीएस), टाटा पॉवर, इंडियन हॉटल्स आणि टाटा केमिकल्ससह समुहाच्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांची भागेदारी आहे. ते सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहे.

रतन टाटा यांचे बंधू जिमी, दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात...मोबाईलसुद्धा वापरत नाही...
रतन टाटा, जिमी टाटा
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 11:33 AM

Who is Ratan Tata brother: भारतातील आदर्शवत उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. ते अविवाहित राहिले. त्यांना भाऊ-बहीण असा परिवार होता. त्यांना दोन भाऊ अन् एक बहीण आहे. त्यांना पुतणे आहेत. परंतु त्यांचे लहान बंधू जिमी टाटा अवलिया व्यक्तीमत्व आहे. ते सर्व चर्चांपासून वेगळेच राहिले आहे. खूप संपत्ती असताना ते मोबाईसुद्धा वापरत नाही. दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात.

टाटांच्या व्यावसायिक साम्राज्यापासून वेगळेच

जिमी टाटा यांच्याकडे संपत्तीची कोणतीही कमतरता नाही. टाटा सन्सची भागेदारी त्यांच्याकडे आहे. ते खूप कमी लोकांना भेटतात. ते आपल्या स्वत:च्या विश्वात रमलेले असतात. त्यांचे जग बिझनेस अन् कारपोर्ट जगापेक्षा वेगळे आहे. त्यांनी कधी टाटांच्या व्यावसायिक साम्राज्याला स्वत:शी जोडले नाही.

जिमा टाटा यांची दुसरा कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी करायची कधीच इच्छा नव्हती. सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहत ते पुस्तके आणि वृत्तपत्रांमधून माहिती घेण्यास प्राधान्य देतात. ‘इंडिया टाइम्स’ने लिहिले आहे की, ते घरातून क्वचितच बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना फार कमी लोक ओळखतात.

हे सुद्धा वाचा

कुलाबामध्ये दोन रुमचा फ्लॅट

जिमी टाटा आता 83 वर्षांचे झाले आहेत. परंतु त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ते खूप साधे आणि शांत व्यक्तीमत्व आहेत. त्यांना आजच्या लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. कौटुंबिक व्यवसायात त्यांनी फारसा रस दाखवला नाही. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका यांनीही जिमीच्या साध्या जीवनशैलीबद्दल एक्सवर पोस्ट केले. त्याने सांगितले की, जिमी मुंबईतील कुलाबा येथील हॅम्प्टन कोर्टच्या सहाव्या मजल्यावर राहतात. त्यांचा दोन बेडरूमचा एका साध्या फ्लॅट आहे. ते खूप चांगले स्क्वॅश खेळाडू आहे. युवा अवस्थेत ते नेहमी स्क्वॅश खेळत होते.

अनेक कंपन्यांमध्ये भागेदारी

जिमी टाटा साधे राहत असले तरी त्यांच्याकडे संपत्ती खूप आहे. ते टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा सन्स, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (टीसीएस), टाटा पॉवर, इंडियन हॉटल्स आणि टाटा केमिकल्ससह समुहाच्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांची भागेदारी आहे. ते सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहे.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.