Video : पेट्रोल पंपावर बिबट्या शिरला, कर्मचाऱ्याची पाचावर धारण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा….!

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. | Ratnagiti Sangameshwar petrol Pump leopard Entry Video

Video : पेट्रोल पंपावर बिबट्या शिरला, कर्मचाऱ्याची पाचावर धारण, पुढे काय झालं तुम्हीच पाहा....!
रत्नागिरीच्या पेट्रोलपंपावर बिबट्या

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या वेळेला बिबट्याने रोड क्रॉस करुन पेट्रोल पंपावर प्रवेश केला. तसंच पेट्रोलवरच त्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला. यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्याची चांगलीच पाचावर धारण बसली. (Ratnagiti Sangameshwar petrol Pump leopard Entry Video)

नेमकं काय घडलं…?

सविस्तर घटना अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंप ओस पडला होता. पंपावर कसलीही गर्दी नव्हती. त्याचवेळी बिबट्याने मुंबई गोवा हायवे ओलांडून पंपावर प्रवेश केला. आजूबाजूला थोडसं निरीक्षण करुन झाल्यावर बिबट्याला कुत्रं निदर्शनास पडलं. मग झालं तर बिबट्याने कुत्र्यावर झडप मारली.

बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा

बिबट्याने जशी कुत्र्यावर झडप मारली तसा कुत्र्याने मोठ्याने आवाज केला. या आजावाने पेट्रोल पंपावर उपस्थित कर्चचारी झोपेतून जागा झाला. त्याने बिबट्याचा हा थरार पाहिला. मात्र पुढच्या काही क्षणांत बिबट्याने पेट्रोल पंपावरुन धूम ठोकली. यावेळी कर्मचाऱ्याची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली होती.

(Ratnagiti Sangameshwar petrol Pump leopard Entry Video)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

VIDEO : भलतंच धाडस! त्यानं चक्क बिबट्याच्या बछड्याला पकडून घेतला सेल्फी, व्हिडीओ व्हायरल

सांगलीत ग्रामस्थांचं अजब धाडस, 12 फुटांची मगर खांद्यावर उचलली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI