महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द, ऐन लॉकडाऊनमध्ये लाखो खातेधारकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड

महाराष्ट्रातील 104 वर्षे जुनी असलेल्या सीकेपी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे (RBI canceled licence of CKP cooperative bank).

महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द, ऐन लॉकडाऊनमध्ये लाखो खातेधारकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड

मुंबई : महाराष्ट्रातील 104 वर्षे जुनी असलेल्या सीकेपी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे (RBI canceled licence of CKP cooperative bank). सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेक शाखा आहेत. ही बँक 1915 मध्ये सुरु झाली होती. परवाना रद्द झाल्याने या बँकेच्या खातेधारकांची 485 कोटी रुपयांची एफडी गुंतवणूक अडकली आहे. याआधी पीएमसी बँकेवरील निर्बंधांनीही खातेधारकांच्या अडचणीतही अशीच वाढ झाली होती. ऐन लॉकडाऊनच्या काळात झालेल्या या कारवाईने बँकेतील खातेधारकांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.

बँकेच्या मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार 11 हजारहून अधिक गुंतवणूकदार, ठेवीदार आणि सव्वा लाख खातेधारकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. बँकेतील 485 कोटींची एफडी देखील या निर्णयामुळे अडकली आहे. आरबीआयने 2014 पासून सीकेपी बँकेवर निर्बंध आणण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली होती. अखेर आरबीआयने सीकेपी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्याचं प्रमुख कारण सीकेपी सहकारी बँकेच्या नेटवर्थमध्ये झालेली घसरण हे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी (30 एप्रिल) रात्री आरबीआयने याबाबत माहिती दिली. सीकेपी बँकेचा परवाना रद्द झाल्याने बँकेतील जवळपास 11,500 गुंतवणूकदार, ठेवीदार आणि सव्वा लाख खातेधारकांवर आर्थिक संकट येणार आहे. मुंबईतील माटुंगा येथे या बँकेचं प्रमुख कार्यालय आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात या बँकेच्या एकूण 8 शाखा आहेत.

नेटवर्थमध्ये मोठा तोडा झाल्यानं परवाना रद्द

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सीकेपी बँकेचा वाढता तोटा आणि नेट वर्थमधील तूट यामुळे बँकेवर 2010 पासून काही निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध वारंवार वाढण्यात आले होते. यावेळी 31 मार्चला संपणाऱ्या निर्बंधांमध्ये 2 महिन्याची वाढ करुन ते 31 मेपर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र, बँकेची डासाळती स्थिती पाहता आरबीआयने या निर्बंधाचा कालवधी संपण्याआधीच परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून अनेकदा तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यासाठी खातेदार आणि गुंतवणुकदार यांनीही प्रयत्न केले. बँकेने व्याजदरात कपात करत ते 2 टक्क्यावर आणले होते.

बँकेतील काही गुंतवणुकदारांनी आपली एफडी शेअर बाजारात गुंतवली होती. त्यानंतर त्याचा काही प्रमाणात परिणामही दिसून बँकेचा तोटाही कमी होत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत आरबीआयने नेटवर्थमधील घट पाहता परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गुंतवणुकदारांना मोठो धक्का बसला आहे. 2016 मध्ये बँकेचा नेटवर्थ 230 कोटी होता. आता हा नेटवर्थ 146 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

संबंधित बातम्या :

आरबीआयच्या निर्बंधानंतर ‘Yes बँके’बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा

YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार

आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर मोठी कारवाई

“आरबीआय चोर आहे”च्या घोषणा, पीएमसी खातेदारांचं आरबीआईसमोर आंदोलन

RBI canceled licence of CKP cooperative bank

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI