AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Lockdown update : निर्बंध शेवटचे, आता मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल : पालकमंत्री

यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असेल. यानंतर मुंबईत लॉकडाऊन (Mumbai Lockdown update) लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) यांनी दिला आहे.

Mumbai Lockdown update : निर्बंध शेवटचे, आता मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल : पालकमंत्री
अस्लम शेख
| Updated on: Apr 03, 2021 | 4:07 PM
Share

मुंबई : यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन (Mumbai Lockdown update) लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) यांनी दिला आहे. लोक ऐकत नाहीत मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील दोन दिवस सुद्धा प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलता अस्लम शेख यांनी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Restrictions will be the last, After this, lockdown will have to be imposed in Mumbai, said Maharashtra minister Aslam Shaikh )

गेल्या दोन महिन्यांपासून आपण जे प्रतिबंध लावले आहेत, त्याबाबत मी किंवा मंत्री आणि मुख्यमंत्री स्वत: लोकांना आवाहन करुन मास्क लावण्यासाठी, गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. निर्बंध लावत लावत आता आपण इथवर पोहोचलो आहे. आणखी किती निर्बंध लावायचे आहेत? आता हा शेवटचा टप्पा आला आहे. आणखी किती कठोर बनायचं? ती मान्यताही संपली आहे. आता शेवटचा प्रयत्न करणार. मुंबईत लॉकडाऊन लावण्याची सरकारची आणि माझी स्वत:ची मानसिकता नाही. पण जर लोकांच्या जीवाचा प्रश्न आला की आमच्याकडे पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. मी आज, उद्या दररोज मार्केटमध्ये जाऊन निवेदन देणार. शेवटपर्यंत प्रयत्न करु, लोकांना आवाहन करु आम्हाला मजबूर करु नका असं आवाहन करणार, असं अस्लम शेख म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कालच दुसरा पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला होता. कुणाकडे दुसरा पर्याय असेल तर तो सांगा, अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर आता अस्लम शेख यांनीही मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईत आता कधीही लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

राज्यात अंशत: लॉकडाऊन (Maharashtra partial lockdown) होण्याचा इशारा ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याने दिला आहे. खुद्द मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी तशी शक्यता काल व्यक्त केली होती. कोरोनाच्या (Corona) उद्रेकामुळे मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याआधी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लॉकडाऊन नसेल पण कडक निर्बंध असतील असं सांगितलं होतं. त्यानंतर अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन शक्य असल्याचं म्हटलं होतं.

अस्लम शेख यांनी काल दिलेली माहिती

मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’अर्थात पार्सलची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स 15 दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल. इतकंच नाही तर रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल, असं अस्लम शेख म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

“लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात, परिस्थिती अशीच राहिली तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.