AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप मुख्यालय नव्हे तर ‘सागर’ बंगला बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र, देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी…

sagar bungalow devendra fadnavis: आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत.सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.

भाजप मुख्यालय नव्हे तर 'सागर' बंगला बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र, देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी...
| Updated on: Oct 21, 2024 | 12:17 PM
Share

devendra fadnavis sagar’ bungalow: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये व्यक्ती केंद्रीत राजकारण होत नव्हते. पक्षाची सूत्र पक्षाच्या मुख्यालयातून चालत होती. परंतु आता भाजपमध्ये बदल होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्र भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभळणार आहे. त्यामुळे भाजपची पहिली यादी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. तिकीट इच्छूक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचत आहेत.

कोण कोण आले सागर बंगल्यावर

पुण्यातील खडकवासला विधानसभा विद्यमान आमदार भीमराव तापकीर सागरवर दाखल झाले आहे. भीमराव तापकीर यांचे नाव पहिल्या यादीत नाव नाही. मावळचे आमदार सुनील शेळके विरोधातील भाजपचे बाळा भेगडे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आला आहे.

अंधेरीतील इच्छूक मुरजी पटेल बंगल्यावर

अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर आले आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. परंतु अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने त्यांनी माघार घेतली होती. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत या भागातून महायुतीला मताधिक्य मिळाले होते.

मुंबईतील भाजपच्या १४ जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र वर्सोवा मतदारसंघ वेट अँड वॉचवर ठेवण्यात आलेला आहे. यामुळे वर्सोवा मतदारसंघातील आमदार भारती लव्हेकर फडणवीस यांच्या भेटीला आल्या आहेत. बोरिवली सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. पहिल्या यादीत सुनील राणेंचे नाव नाही. त्यामुळे ते फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे.

मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. मुंबादेवी येथून अतुल शाह इच्छुक आहेत. मुंबादेवी मतदारसंघावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस आमदार अमिन पटेलांविरोधात शाह मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत.

पत्नीला उमेदवारी, आता मुलासाठी पाचपुतेंचा आग्रह

बबनराव पाचपुते हे त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासोबत सागर बंगल्यावर आले आहेत. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाली. मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत.

सत्यजित तांबे दाखल होताच जोरदार चर्चा

आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत.सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.

सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गर्दी

  • श्रीगोंदा – बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते
  • वर्सोवा – भारती लव्हेकर
  • खडकवासला – भीमराव तापकीर
  • मावळ – इच्छुक बाळा भेगडे
  • बोरीवली – सुनिल राणे
  • मुंबादेवी – इच्छुक अतुल शाह
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.