AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांकडून पंतप्रधानांचा राष्ट्रपिता असा उल्लेख, त्यावर संजय राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये दिलं उत्तर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते, मंत्री आणि अगदी राज्यपाल यांच्याकडूनही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांनी आपण निशब्द असल्याचा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे. 

अमृता फडणवीसांकडून पंतप्रधानांचा राष्ट्रपिता असा उल्लेख, त्यावर संजय राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये दिलं उत्तर
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 21, 2022 | 7:58 PM
Share

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं साऱ्या जगाकडून संबोधले जाते, तर आता मात्र अमृता फडणवीस यांनी आता राष्ट्रपिता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधले आहे. अमृत फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपिता असा उल्लेख केल्यानंतर त्या गोष्टीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मी निशब्द झालो आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

त्यांच्या या प्रतिक्रियेवर काय बोलायचे हेच मला सूचत नाही असंही त्यांनी गंभीरपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच प्रतिक्रिया देतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी मंत्र्यांच्या, राज्यपालांच्या वक्तव्यावेळी त्यांनी टीका केली होती. यावेळीही संजय राऊत म्हणाल्या की, नवीन नवीन ज्या भूमिका येत आहेत. त्याबद्दल आता काय बोलायचं हेच कळत नाही. त्यामुळे या वक्तव्यावर मी काहीच बोलणार नाही असं म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते, मंत्री आणि अगदी राज्यपाल यांच्याकडूनही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांनी आपण निशब्द असल्याचा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे.

Follow Us
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?