AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एकाच पक्षाच्या नेत्यांना ‘दिलासा’ कसा मिळतो, संजय राऊत यांचे न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह, सोमय्या प्रकरणावर संतप्त

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे प्रकार सुरू आहेत. हे दिलासे महाविकास आघाडीतील नेत्यांना का मिळत नाहीत. त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये. आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे पाहून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असते.

Sanjay Raut : एकाच पक्षाच्या नेत्यांना 'दिलासा' कसा मिळतो, संजय राऊत यांचे न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह, सोमय्या प्रकरणावर संतप्त
संजय राऊत.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 14, 2022 | 11:48 AM
Share

मुंबईः एकाच पक्षाच्या नेत्यांना ‘दिलासा’ कसा मिळतोय, असा सवाल करत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज 14 एप्रिल रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मिळालेल्या जामिनावर त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. घोटाळा 58 रुपयांचा असो की 58 कोटींचा असो. गुन्हा हा गुन्हाच असतो. सोमय्यांना न्यायालयाने अजून निरपराध ठरवले नाही. मात्र, महाराष्ट्रात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय महाविकास आघाडीच्या लोकांना असा दिलासा का मिळत नाही. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आता आम्ही कोणाला कायदा शिकवायचा. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे पाहून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आरोपीने संयम बाळगावा…

संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा अपहार शंभर टक्के झालेला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. आरोपी भूमिगत झाले होते. आरोपी फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आरोपी उगाच जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा.

भयंकर प्रकरणे समोर येणार…

संजय राऊत म्हणाले की, आपण आरोपी आहात हे विसरू नका. तुमच्यावरती आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केलेला आहे. टीव्हीसमोर येऊन मोठ्यामोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. आणि याही पेक्षा भयंकर अशी तुमची प्रकरणे समोर येणार आहेत हे लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे आता पितळ उघडे पडलेले आहे. तेव्हा कोणी जर काही म्हणत असेल, तर त्यांना म्हणू द्या. आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत.

न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतचा घोटाळा 58 कोटींचा झालेलाच आहे. पैसे गोळा करून त्याचा अपहार झालेलाच आहे. खरे म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय. गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे प्रकार सुरू आहेत. हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे. महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकास आघाडीतील नेत्यांना का मिळत नाहीत. त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये. आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे, असा आरोप करत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप