AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नार्वेकर, निवडणूक आयोग खरे बौद्धिक नक्षलवादी; संजय राऊत यांचा घणाघात

संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर 'बौद्धिक नक्षलवादी' असल्याचा गंभीर आरोप केला. शिवसेना फुटीच्या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेमुळे संविधानाचे 'वस्त्रहरण' झाल्याचे राऊत म्हणाले. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा संदर्भ देत, राऊत यांनी म्हटले की नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब करून संविधान गाडले. हाच खरे 'बौद्धिक नक्षलवादी'पणा आहे.

नार्वेकर, निवडणूक आयोग खरे बौद्धिक नक्षलवादी; संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 10:45 AM
Share

शिवसेनेवरील कालच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. त्यांचं वस्त्रहरण केलं. संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, हे दाखवून दिलं. त्यामुळे मोदींच्या भाषेत हेच खरे बौद्धिक नक्षलवादी आहेत. खरे बौद्धिक नक्षलवादी हे विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग आहे. यांनी संविधान गाडलं तेच बौद्धिक नक्षलवादी आहेत, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांनी हा हल्ला चढवला.

सर्वोच्च न्यायालयात काल शिवसेना पक्षावर सुनावणी होती. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कालच्या सुनावणीत सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवलं. संजय राऊत यांनी सिब्बल यांच्या युक्तिवादाचं कौतुक केलं आहे. कालचा युक्तिवाद अत्यंत उत्तम होता, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाही चढवला. तसेच विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला बौद्धिक नक्षलवाद्याची उपमाही दिली.

नार्वेकरांचं वस्त्रहरण, चिंधड्या उडाल्या

शिवसेना सोडून 13 जण सूरतला गेले. त्या दिवशीच आम्ही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा आग्रह होता. तो निकाल वेळेत लागला असता तर पुढचं काहीच घडलं नसतं. त्या निकालाची वाट न बघता विधीमंडळ पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि पक्ष चिन्ह मिंधे गटाला विकलं. मोठा व्यवहार झाला. काल नार्वेकरांचं वस्त्रहरण केलं. चिंधड्या उडवल्या. सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांना निर्वस्त्र केलं. संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे हे दाखवून दिलं. मोंदीच्या भाषेत बौद्धिक नक्षलवादी आहेत. खरे बौद्धिक नक्षलवादी निवडणूक आयोग आहे. विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ज्यांनी संविधान गाडलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत, असं राऊत म्हणाले.

बौद्धिक नक्षलवादी कोण?

सिब्बल यांनी सांगितलं, तो निकाल आधी द्या. आपोआप पुढची गाडी सुरळीत होते. सिब्बल यांनी काल उत्तम युक्तिवाद केला. कायद्याला धरून झालेला युक्तिवाद आहे. कालच्या युक्तिवादाने बौद्धिक नक्षलवादी कोण? हे स्पष्ट झालं. विधिमंडळातील फूट ही पक्षातील फूट माणून पक्ष विकला ते विधानसभा अध्यक्ष बौद्धिक नक्षवलवादी आहेत. कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने या विक्रीत भाग घेतला ते नक्षलवादी आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानाचाही समाचार घेतला. नार्वेकर म्हणजे काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा असू नये. पण नार्वेकराने भाजपची नवी कार्यकारिणी ट्विटरवर टाकून त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचं काय सांगता? तुम्ही पक्षपाती आहात. तुम्ही हा निर्णय घेतला. आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हा निकाल दिला. त्याबद्दल मला नोटीस आली तरी स्वीकारायाला तयार आहे, असं ते म्हणाले.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन