तेव्हा तुमचा बार कुठून उडेल? खालून की वरून?; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

लालूं यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत आम्ही आहोत. आमची त्यांना साथ असेल. त्यांचं कुटुंब फुटणार नाही. यादव कुटुंब एकनाथ शिंदे यांच्यासारखं गुडघ्यावर झुकणार नाही. महाराष्ट्रच काय छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये भाजप पराभूत होणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य व्यक्त केलं.

तेव्हा तुमचा बार कुठून उडेल? खालून की वरून?; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:51 AM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले. त्यांना आपल्या लोकांनी शाखेपर्यंत येऊच दिलं नाही. त्याचा बार फुसका निघाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून उडेल ते बघा. 31 डिसेंबरनंतर तुम्ही मुख्यमंत्रीपदी नसाल. मग तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात ते कळेल. शिवसेनेचा बार गेल्या 50 वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार कधीच उडवलाय. तो आधी बघा, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेअब्रू केली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईमध्ये आम्ही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलीस आले होते. आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही संयमाने घेतलं. त्यामुळे नक्कीच संघर्ष टळला, असं संजय राऊत म्हणाले.

तर शाखा ताब्यात घेतली असती

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवले गेले आहेत. शिवसेनेला तोडण्याचं भाजपचं जुनं स्वप्न आहे. मिंधे गटाला फोडूनही त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काही लोक तोडून शिंदे सरकार बनवले. जाऊ द्या. आता आमच्याच लोकांना आमनेसामने आणून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. हे प्रत्येक राज्यात सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि दिवाळी नसती तर ती शाखा आम्ही ताब्यात घेतली असती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुलाम करणे हाच विचार

एकनाथ शिंदे यांची टोळी ही चोरांची गँग आहे. दोघांमध्ये भांडण लावण्यावर भाजपची नेहमीच नजर असते. दोघांमध्ये भांडणं लावणं हाच भाजपचा विचार आहे. जात, धर्माच्या नावावर पार्टी तोडण्याचा भाजपचा विचार आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. आता हेच लोक भाजपचे प्रचारक आहे का? सत्ता, पैसा आणि उद्योग हाच भाजपचा विचार आहे. लोकांना गुलाम बनवणे हा भाजपचा विचार आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते आताच गेले आहेत

शिंदे आणि अजितदादा गटाचे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाणार आहेत. असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्याचं त्यांनी समर्थन केलं. लोकसभेपूर्वी कशाला ते आताच भाजपमध्ये आहेत. त्यांचे अंतर्वस्त्र पाहिलं तर त्यावर कमळच आहे. त्यांच्या फुल पँटमध्ये खाकी हाफ चड्डी आहे. ती आताच घालायला सुरवात केली आहे. आतमध्ये कमळाची अंडरविअर आहे. तुम्ही कधी गेला तर त्यांना विचारा दाखवा काय आहे ते? त्याशिवाय ते मुख्यमंत्री पदावरती राहू शकत नाही. नंतर कशाला जायला हवे ते आताच गेले आहेत. आताच ते गुलाम झाले आहेत. गुलामाना स्वतःचे मत आणि स्वाभिमान नसतो, असा हल्ला त्यांनी चढवला.

आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.