AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?

हाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं?

तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?
तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का?; संजय राऊत असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2023 | 11:45 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपने ‘मिशन 145’ सुरू केलं आहे. भाजपच्या या ‘मिशन 145’चं रणशिंग फुंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे. भाजप जर ‘मिशन 145’ सुरू करत आहे. तर शिंदे गटाला काय धुणीभांडी करायला ठेवणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

भाजपचे जर ‘मिशन 145’ असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे? भाजपचे ‘मिशन 145’ असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणा. ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. याबाबत मला अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणाले.

मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचं संभाजी नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या सरकारमध्ये त्या प्रस्तावाचं काय झालं? असा सवाल राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका. हे गल्लीतलं भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं. त्यांना एक संधी मिळाली आहे. भले ती बेकायदेशीर मिळाळी असेल. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवं, असा चिमटा त्यांनी काढला.

विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात. कोणी मंत्री म्हणून बोलत असतो, तर कोणी विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असेल तर त्यांनी कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान