Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : चुरशीच्या लढतीत आमदारकीचा चौकर, शिंदेचे विश्वासू शिलेदार, मंत्रिपदाची शपथ घेणारे कोण आहेत संजय शिरसाट?

Sanjay Shirsat in Cabinet : महायुतीची बाजू मांडण्यासाठी घटक पक्षांचे नेते तडाखेबंद खिंड लढवत होते. शिंदे सेनेत गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासोबतच मराठवाड्यातील संजय शिरसाट यांनी हा किल्ला हिरारीने लढवला. कोणतेही वाद न ओढवता त्यांनी पक्षाची बाजू मांडली. त्यांचा मंत्रि‍पदाचा वनवास आता संपला आहे.

Sanjay Shirsat : चुरशीच्या लढतीत आमदारकीचा चौकर, शिंदेचे विश्वासू शिलेदार, मंत्रिपदाची शपथ घेणारे कोण आहेत संजय शिरसाट?
एकनाथ शिंदे संजय शिरसाट
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 5:34 PM

महायुतीने राज्यात अडीच वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत सत्ता काबीज केली. त्या काळात दोन पक्षांचे सरकार होते. पुढे त्यात अजितदादा यांची राष्ट्रवादी दाखल झाली. महायुती विधानसभेला सामोरं गेली. त्यात जोरदार यश मिळवलं. 288 पैकी 232 जागांवर महायुतीने घवघवीत यश मिळवलं. या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत चुरशीच्या लढतीत संजय शिरसाट यांनी मोठ्या मताधिक्यांनी हा सामना जिंकला. त्यांनी गेल्या अडीच वर्षात मंत्री पद नसताना सुद्धा संयम दाखवला. पक्षाची, एकनाथ शिंदे यांची बाजू हिरारीने मांडली. महाविकास आघाडीच्या आरोपांना दररोज त्यांनी प्रत्युत्तर दिले. इतर मंत्र्यासोबत शिंदे सेनेची प्रखर बाजू मांडली. महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला. आता त्यांच्या या सर्व कष्टाला यशाचे कोंदण लागले आहे. त्यांचा मंत्रि‍पदाचा वनवास आता संपुष्टात आला आहे. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मंत्रिपदाची हुलकावणी

गेल्या मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी ते इच्छुक होते. पण त्यांना मंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली. मंत्रि‍पदाऐवजी त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तरीही संयम ठेवत त्यांनी अनेकदा संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेकांना अंगावर घेतले. मुद्देसुद मांडणी आणि आक्रमक भाषा ही त्यांची वैशिष्ट्ये आहे. पण त्यांनी संयम ढळू दिला नाही. वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला. यावेळी त्यांना मंत्रि‍पदाने हुलकावणी दिली नाही. त्यांना या कार्याचे बक्षीस मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत संजय शिरसाट

संजय शिरसाट हे रिक्षा चालक होते. बाळासाहेबांच्या विचाराने ते अत्यंत भारावले. ते शिवसेनेत दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल नगर, कोकणवाडी परिसरातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. या भागातून ते 2000 मध्ये नगरसेवक झाले. पुढे सभागृह नेते म्हणून त्यांनी महापालिकेत काम पाहिले. ते शिवसेना विभाग प्रमुख पण होते.

2009 मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर दुसर्‍यांदा 2014 आणि 2019 मध्ये ते याच मतदार संघातून निवडून आले. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. त्यांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी फिल्डिंग लावली होती. त्यांच्याविरोधात राजू शिंदे हे उभे ठाकले होते. पण सर्व अंदाज चुकवत संजय शिरसाट हे विजयी झाले. शिंदे सेनेच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जोरदार खिंड लढवली आणि आता त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....