शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेत दुसरा धक्का, नीकटवर्तीय अधिकारी शरद उघाडे यांची बदली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापालिकेत किरण दिघावकर आणि शरद उघाडे हे आदित्य ठाकरे यांचे नीकटवर्तीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. आदित्य ठाकरे यांनी किरण दिघावकर आणि शरद उघाडे यांच्या माध्यमातून वरळी तसंच दादर-माहीम विधानसभा मतदार संघात अनेक विकास कामे आणि सौंदर्यीकरणच्या अनेक संकल्पना पूर्णत्वास आणल्या होत्या.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेत दुसरा धक्का, नीकटवर्तीय अधिकारी शरद उघाडे यांची बदली
आदित्य ठाकरेंना आणखी एक धक्काImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 10:26 PM

मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार आल्यानंतर, मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेना नेत्यांच्या जवळचे अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु असल्याचे दिसते आहे. वरळी विधानसभा मतदार संघातील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या मर्जीतील महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांची बदली करण्यात आलेली आहे. शरद उघाडे यांची डी विभागाच्या सहायक आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेचच जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली होती.

दिघावकर आणि उघाडे हे आदित्य यांचे नीकटवर्तीय अधिकारी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापालिकेत किरण दिघावकर आणि शरद उघाडे हे आदित्य ठाकरे यांचे नीकटवर्तीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. आदित्य ठाकरे यांनी किरण दिघावकर आणि शरद उघाडे यांच्या माध्यमातून वरळी तसंच दादर-माहीम विधानसभा मतदार संघात अनेक विकास कामे आणि सौंदर्यीकरणच्या अनेक संकल्पना पूर्णत्वास आणल्या होत्या. मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपातील संघर्ष तीव्र झालेला असताना, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांची बदली करुन शिवसेनेला आणि विशेषता आदित्य ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न भाजपाने केलेला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या?

  1.  सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांची बदगली पी, दक्षिण विभागातून जी दक्षिण विभागात करण्यात आलेली आहे.
  2. सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांची बदली जी दक्षिण विभागातून डी विभागात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान पदाचा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तसाच राहणार आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच बदली डी विभागातून मालमत्ता विभागात करण्यात आली आहे, यापूर्वी त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
  5. कार्यकारी अभियंता राजेश अक्रे यांची बदली पी, दक्षिण विभागातून सहाय्यक आयुक्तपदी पी दक्षिण विभागात अतिरिक्त कार्यभारपदी करण्यात आलेली आहे. हे कार्यालयीन आदेश आजच लागू करण्यात आलेले आहेत.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.