AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचे मोठे संकेत, त्या वक्तव्याने राज्याच्या उंचावल्या भुवया

Sharad Pawar On NCP Reunion : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनोमिलन होण्यापूर्वी मोर्चा मिलन होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाकडे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहे. त्यातच शरद पवार यांच्या त्या वक्तव्याने राज्याच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचे मोठे संकेत, त्या वक्तव्याने राज्याच्या उंचावल्या भुवया
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 28, 2025 | 9:23 AM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा निमित्त एकत्र येत आहेत. दोघांचे मनोमिलन होण्यापूर्वी मोर्चा मिलन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीतही एकत्रीकरणाची हवा जोर धरू लागली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या वाऱ्याला ही उभं राहायचं नाही असा स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली होती. तर आता पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रि‍करणाविषयी मोठे भाकीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कार्यकर्त्यांमध्ये शंभर हत्तीचे बळ संचारले आहे. काय म्हणाले शरद पवार?

मतभेद विसरून एकत्र येणे चांगलेच

मनसे आणि शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा सवाल शरद पवार यांना कोल्हापूरात माध्यम प्रतिनिधींनी विचारला. राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे असे स्पष्ट संकेत पवारांनी दिले. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले.

तर मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र आले तर चांगलेच आहे. दोन भाऊ मतभेद विसरून एकत्र येणे चांगलेच असते. पण ते एकत्र येतील की नाही हे सांगायला आपण ज्योतिषी नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला.

दोन्ही पवारांनी एकत्र यावे

दोन्ही पवारांनी एकत्र यावे, असं मला वाटतंय. एकत्रित आल्यास माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्याना आनंदच होईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्या संदर्भात मी स्वतः खासदार शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलून एकत्रित येण्या संदर्भात आग्रही भुमिका मांडली असल्याचे ते म्हणाले. दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी पाडुरंगाला मी साकडे घातले आहे.

दोन्ही ठाकरे आपल्या मराठी भाषेच्या अस्मितेच्या विषयावरुन एकत्रित येत आहेत. त्यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला आनंदच आहे. पाचवी इयत्तेनंतरच हिंदी असायला हवे असे मला वाटते. .मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधुच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.एकीकडे मराठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणी दुसरीकडे सरकारने हिंदी सक्ती करायची यातून सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...