शायना एनसी यांना पितृशोक, नाना चुडासामा यांचं निधन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : ‘जायंट इंटरनॅशनल’ आणि ‘मुंबई माझी लाडकी’ संस्थेचे संस्थापक, मुंबईचे माजी शेरीफ, पद्मश्री नाना चुडासामा यांचे आज दु:खद निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. आज सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. भाजपच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी या नाना चुडासामांच्या कन्या आहेत. […]

शायना एनसी यांना पितृशोक, नाना चुडासामा यांचं निधन
Follow us on

मुंबई : ‘जायंट इंटरनॅशनल’ आणि ‘मुंबई माझी लाडकी’ संस्थेचे संस्थापक, मुंबईचे माजी शेरीफ, पद्मश्री नाना चुडासामा यांचे आज दु:खद निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. आज सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. भाजपच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी या नाना चुडासामांच्या कन्या आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांत नाना चुडासामा यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

कोण होते नाना चुडासामा?

नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणारे व्यक्तीमत्त्व होते. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संथापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थाचा कारभारात त्यांनी विषेश कामगिरी केली होती. 2005 साली त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देश-विदेशातील घटनांवर मामिर्क टिप्पणी करण्यासाठी ते ओळखले जायचे.

चुडासामा यांच्या रुपाने आपण मुंबईच्या विकासाची तळमळ असलेला ‘दक्ष मुंबईकर’ गमावल्याची खंत राज्यपाल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.