AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार… उद्धव ठाकरे यांचे फडणवीस यांना उघड आव्हान

uddhav thackeray on devendra fadnavis: सत्तेवर आल्यावर धारावीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आदानींचे टेंडर रद्द करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी कंत्राटदार माझा लडाक योजना सुरु केली आहे. पण ही योजना चालणार नाही.

राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार... उद्धव ठाकरे यांचे फडणवीस यांना उघड आव्हान
uddhav thackeray devendra fadnavis
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 31, 2024 | 2:29 PM
Share

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उबाठामधील राजकीय वैर संपण्याची चिन्ह नाही. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेद्र फडणवीस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उघड आव्हान दिले. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार, असा थेट इशारा देत आता ‘आर किंवा पार’ची राजकीय लढाई सुरु केली. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती हल्ले केले. बाळासाहेब यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, असे त्यांनी म्हटले.

मी जिद्दीने उभे राहिलो

सर्व सहन करुन मी जिद्दीने उभे राहिलो आहे. आता राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार आहे. मुंबईत राहून तुम्ही मराठी माणसाला घर देणार नाही, नोकरी देणार नाही. चालले तरी काय? जिकडून तुम्ही आला आहात, तिकडे जा. आता या ठिकाणी प्रचाराला या. मग तुमची उरली सुरली गुरमी उतरवतो, असे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हटले. त्यांना शिवसेना संपवयाची आहे. त्यांच्याकडे एका बाजूला सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा आहेत. परंतु माझ्या बाजूला कार्यकर्ते आहेत.

बूटचाट्यांनी खुर्चीसाठी वार केले

मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती. त्यानंतर त्यांचे उरले सुरले कपडेही उतरवले असते. तुम्ही आमदार, खासदार खरेदी केले असतील पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते खरेदी करु शकत नाही. बूटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

धारावी प्रकल्प रद्द करणार

सत्तेवर आल्यावर धारावीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आदानींचे टेंडर रद्द करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी कंत्राटदार माझा लडाक योजना सुरु केली आहे. पण ही योजना चालणार नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी