VIDEO: शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांनी 36 इमारती विकत घेतल्या; Kirit Somaiya यांचा खळबळजनक दावा

शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

VIDEO: शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांनी 36 इमारती विकत घेतल्या; Kirit Somaiya यांचा खळबळजनक दावा
शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांनी 36 इमारती विकत घेतल्या; Kirit Somaiya यांचा खळबळजनक दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 4:19 PM

मुंबई: शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधवांवर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. यशवंत जाधव यांनी मुंबईत 36 हून अधिक जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत. त्यात एक हजाराहून अधिक गाळे घरं आहेत. जुन्या इमारती पगडीच्या आहेत. रोख पेमेंट देऊन त्या घेतल्या आहेत. हा एक हजाराहून अधिक कोटीचा घोटाळा बाहेर आला आहे, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. ईडी (ED), आयकर विभाग आणि कंपनी मंत्रालयाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर येत्या काही दिवसात कारवाई होणार हा विश्वास आहे. यशवंत जाधवांकडे एवढी संपत्ती आहे तर त्यांच्या नेत्यांकडे किती?, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आधी ट्विट करून आणि नंतर मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षात 36 मालमत्ता खरेदी केल्या आहेत. 2020मध्ये 7 आणि 2021मध्ये 24 मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचं आयकर विभागाच्या धाडीतून उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. माझगाव येथील बिलखांडी चेंबर येथेही त्यांनी काही घरे विकत घेतली आहेत. जुनी घरे कमी किंमतीत त्यांनी विकत घेतली आहेत. तसेच गाळे आणि जुन्या इमारतीतील खोल्याही त्यांनी विकत घेतल्याचा भाजपचा आरोप आहे. दरम्यान, या सर्व व्यवहारांचा तपास सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

26 मार्च रोजी किरीट सोमय्या दापोलीत मार्च

दरम्यान, येत्या 26 मार्च रोजी किरीट सोमय्या दापोलीत मार्च काढणार आहेत. साई रिसॉर्टच्या अनिधिकृत बांधकामावर हातोडा पडावा म्हणून सोमय्या आक्रमक झाले आहेत. या मार्चला मुंबईतून सुरुवात होणार आहे. या मार्चसाठी मुंबईतून 100 वाहने भरून कार्यकर्ते निघणार आहेत. त्यानंतर खेड ते दापोली असा हा विराट मार्च निघणार आहे. दापोलीतल मुरुड समुद्र किनारी पालकमंत्री अनिल परब यांचा हा अनधिकृत रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या यांनी या मार्चचे आयोजन केले आहे.

संबंधित बातम्या:

आघाडीची ऑफर हे तर ‘जलील’ षडयंत्र; Sanjay Raut यांची खोचक टीका

पाकव्याप्त Kashmir भारताला कधी जोडणार?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

Goa Government Formation: गोव्याचे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला, अमित शहांच्या घरी बैठक, विश्वजीत राणेंचं काय होणार?

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.