AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठं काहीतरी घडणार? मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये जोरदार खलबतं, उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या आमदारांना मोलाच्या सूचना देणार आहेत.

राजकारणात मोठं काहीतरी घडणार? मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये जोरदार खलबतं, उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 26, 2024 | 9:51 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामागील कारणही तसं आहे. विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारदेखील या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनतेला खूश करण्यासाठी मोठमोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर विरोधकांसाठी देखील हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. विरोधकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी विविध मुद्दे मांडत सरकारवर निशाणा साधला आहे. दिवसभरातील या घडामोडींनंतर आता राजकीय घडामोडींना खरा वेग आलेला आहे. कारण मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनीती असणार? यावर या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीत उपस्थित आहेत. पण खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना बैठकीसाठी उपस्थित आमदार

  • 1)अजय चौधरी
  • 2) वैभव नाईक
  • 3) नितीन देशमुख
  • 4) सुनिल प्रभू
  • 5) प्रकाश फातर्फेकर
  • 6) कैलास पाटील
  • 7) विधान परिषदेचे आमदार अनिल परब
  • 8) उदयसिंह राजपूत
  • 9) विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर
  • 10) ऋतुजा लटके
  • 11) अंबादास दानवे
  • 12) आदीत्य ठाकरे
  • 13) अजय चौधरी 14) विलास पोतनीस

गैरहजर आमदार

भास्कर जाधव (प्रवासात), सुनिल शिंदे, शंकरराव गडाख अपक्ष (कौटुंबिक कारण), संजय पोतनीस

पावसाळी अधिवेशनातील विरोधकांचे मुद्दे

शेतकरी कर्जमाफी

  • दुधाला कमी भाव
  • नीट परीक्षा रद्द
  • बोगस बियाणे
  • ज्यादा भावात बियाणे विक्री
  • बेरोजगारी
  • अटल सेतू भेगा
  • शेतकरीला मदत न करने
  • शेतकरीला पीक कर्ज न देने
  • कायदा सुव्यवस्था
  • पोलीस भरती रद्द
  • परीक्षा घोळ
  • पेपर फुटी
  • पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण
  • महागाई

हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.