AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच दुही

उद्धटपणे उत्तरे देणाऱ्या महापालिका आयुक्तांना परत पाठवा, ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही. | Shivsena leaders BMC Iqbal Chahal

महापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच दुही
| Updated on: Oct 14, 2020 | 1:58 PM
Share

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि आयुक्तांमधील वाद शमला असे वाटत असतानाच आता याप्रकरणाला पुन्हा नवे वळण लागले आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी आयुक्तांविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून पक्षातील नेत्यांमध्येच एकमत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर कडाडून टीका केली होती. आमचे प्रश्न सोडवायला वेळ नसेल तर इकबाल सिंह चहल यांच्याऐवजी दुसरा अधिकारी आणावा, असे विशाखा राऊत यांनी म्हटले होते. (Internal conflicts between BMC Shivsena leaders)

मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वेगळीच भूमिका मांडली. महापौर ठिय्या आंदोलनाला बसल्या त्या महापौर म्हणून नव्हे तर विभागाच्या नगरसेविका म्हणून बसल्या होत्या. उद्धटपणे उत्तरे देणाऱ्या महापालिका आयुक्तांना परत पाठवा, ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही, पक्ष अशी मागणी करणार नाही, असे जाधव यांनी म्हटले. एकूणच यशवंत जाधव हे किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मूळ वाद बाजूला पडला असून पालिकेत शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरु झाली आहे.

तत्पूर्वी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन करुन दिलगिरी व्यक्त केली. मला लहान भाऊ समजून माफ करा, असे त्यांनी म्हटले. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी, लहान भावानंही यापुढे मोठ्या बहिणीचं ऐकावं, असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिले.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते.

पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर होते. तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तही गैहरजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या. याविषयी बोलायला विशाखा राऊत यांनी आयुक्तांना फोन केला तेव्हा त्यांनी उद्धट भाषेचा वापर केला. त्यामुळे विशाखा राऊत संतापल्या होत्या.

तर कर्मचारी गैरहजर राहिल्यास निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं. यासाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी ठिय्या आंदोलन केलं.

संबंधित बातम्या: मुंबईच्या महापौरांचा दालनातच ठिय्या, प्रभाग समित्यांच्या निवडणुकासांठी कर्मचारी गैरहजर

(Internal conflicts between BMC Shivsena leaders)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.