मला रहावलं नाही म्हणून आलो, कुणीही फिरकलं नसताना शिवसेनेचा पहिला नेता शेतकरी आंदोलनात

दिलीपमामा लांडे यांनी 'मी शेतकऱ्यांचा मुलगा असून, मला राहावलं नाही म्हणून मी आझाद मैदानात पोहोचलो, असं सांगितलं. (Dilip Lande Shivsena Farmers Protest)

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:07 AM, 26 Jan 2021
मला रहावलं नाही म्हणून आलो, कुणीही फिरकलं नसताना शिवसेनेचा पहिला नेता शेतकरी आंदोलनात
दिलीप लांडे, आमदार, शिवसेना

मुंबई : शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे आझाद मैदानात सुरु असलेल्या संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या महामुक्काम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले आहेत. महामुक्काम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात पोहचणारे शिवसेनेचे ते पहिले नेते आहेत. आझाद मैदानात 24 जानेवारीपासून सुरु असलेल्या महामुक्काम आंदोलनाची आज सांगता होणार आहे. दिलीप मामा लांडे यांनी यावेळी बोलताना,’मी शेतकऱ्यांचा मुलगा असून, मला राहावलं नाही म्हणून मी आझाद मैदानात पोहोचलो, असं टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. लांडे यांनी आझाद मैदानातील शेतकरी नेत्यांची भेट घेतली. (Shivsena MLA Dilip Lande visit farmers at Azad Maidan for support Framers Protest)

आझाद मैदानात पोहोचणारे शिवसेनेचे पहिले नेते

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी महामुक्काम आंदोलनासाठी मुंबईत पोहोचले होते. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांना नाष्ट्याची व्यवस्था केली होती. आझाद मैदानात 25 जानेवारीला झालेल्या सभेत शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळसाहेब थोरात आझाद मैदानात सभेला उपस्थित होते. शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीवरुन चर्चा रंगली होती. मात्र, आज शिवेसना आमदार दिलीप लांडे आझाद मैदानावर पोहोचले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असं लांडे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिलेली आहे. शिवसेनेने सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. सेना यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवेल आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, असं दिलीपमामा लांडे म्हणाले. मुंबई आंदोलनासाठी जमलेले शेतकरी नाहीत, असं भाजप नेत्यांचं विधान चुकीचं आहे. इथे सर्व शेतकरीच आहेत. भाजप नेत्यांना विश्वास बसत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा दाखवायलाही तयार आहे, असं दिलीप लांडे यांनी भाजप नेत्यांना ठणकावलं.

नाना पटोले यांच्या हस्ते आझाद मैदानात ध्वाजारोहण

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आजाद मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात ध्वजारोहण करण्यातं आलं. सर्व शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. कृषी कायद्याद्वारे अन्नदात्याला उद्धवस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे कोणत्या पक्षाचे आंदोलन नाही, हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असं नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

Farmer Protest : 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही : आदित्य ठाकरे

(Shivsena MLA Dilip Lande visit farmers at Azad Maidan for support Farmers Protest)