‘महाराष्ट्रात आता गोपीनाथ मुंडे आणि महाजनांच्या काळातील भाजप उरलेला नाही’

Vinayak Raut | स्वतःच्या कुटुंब कलेक्शनमध्ये गुंतलेला आहे खरंतर नारायण राणे नितेश राणे ह्या लोकांनी लोकांवर जी ED ची कारवाई केली होती. अवैध संपत्ती जमा केल्याबद्दल प्रकरणी ED च्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले.

'महाराष्ट्रात आता  गोपीनाथ मुंडे आणि महाजनांच्या काळातील भाजप उरलेला नाही'
विनायक राऊत, शिवेसना खासदार

मुंबई: सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोदजी महाजन चंद्रकांत पाटील यांची भाजपा राहिलेली नाही. तर प्रसाद लाड, नितेश राणे सारख्या भांडग्यांची भाजपा झालेली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागलेले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर तर भविष्यकाळ आहे अन्यथा या भांडग्यांच्या संगे भाजपा सुद्धा संपून जाईल. माहीमपासून शिवसेना भवन चालण्याचा जो काही कोल्हेकुई करतात त्यांना त्या ठिकाणी गाडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे मुंबईकरांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे विनायक राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली. स्वतःच्या कुटुंब कलेक्शनमध्ये गुंतलेला आहे खरंतर नारायण राणे नितेश राणे ह्या लोकांनी लोकांवर जी ED ची कारवाई केली होती. अवैध संपत्ती जमा केल्याबद्दल प्रकरणी ED च्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावं आणि मग शिवसेनेवर टीका करावी. तुमची ओळखच शिवसेनेतून निर्माण झालेली आहे, त्या शिवसेनेवर टीका करत असताना तुमची जीभ हसडण्याची ताकद शिवसेनेमध्ये असल्याचे विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना भवनाला भाजपाचा बालेकिल्ला  बनवणे स्वप्नात पण शक्य होणार नाही, आयुष्यात तर नाहीच.  भविष्यामध्ये त्यांच्या कणकवली मध्ये सुद्धा त्यांचे विसर्जन करण्याचे निर्धार आमच्या शिवसैनिकांनी केला असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

प्रसाद लाड म्हणाले, सेनाभवन फोडू; छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा, म्हणाले…

प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी 3 शब्दात इज्जत काढली

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI