सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट, सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान

लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.

सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट, सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान
Namrata Patil

|

Jan 20, 2020 | 6:20 PM

मुंबई : लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे. मोठ्या नेत्यांपासून सेलिब्रिटी बाप्पाच्या चरणी लीन होतात. त्याचा आशिर्वाद घेतात. चांदी सोन्याचे आभूषण अर्पण करतात. अशाच एका भक्ताने सिद्धीविनायकाच्या चरणी तब्बल 35 किलो सोनं दान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर शिंदूर लेपनासाठी बंद होते. या दरम्यान नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत 14 कोटींच्या घरात आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एवढं सोनं चढवणाऱ्या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत.

बाप्पाचा घुमट हा सोन्याने मढवण्यात आला आहे. त्यासोबतच दरवाजेसुद्धा सोन्याने मढवण्यात आले आहेत. याचे सौंदर्य शब्दात व्यक्त करता येत नाही. दिल्लीतील एका भक्ताने हे सोनं बाप्पाच्या चरणी दान केल्याची माहिती मिळत असून ज्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.

बाप्पाचं हे गोंडस आणि डोळ्याचे पारणे फिटणार रुप पाहून भक्तांचं मन प्रसन्न झालं आहे. बाप्पाचा सोनेरी घुमट पाहण्यासाठी भक्तांची एकच गर्दी केली आहे. दूरवरुन भक्त लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.

येत्या 28 जानेवारीला माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होतो असं बोललं जातं. या निमित्ताने 15 जानेवारीपासून पाच दिवस शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ते आज (20 जानेवारी) उघडण्यात आलं. त्यानंतर रितसर पूजा आणि विधी करुन बाप्पाला आरसा दाखवण्यात आला. यानंतर भाविकांसाठी दर्शनाकरिता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

“सोन मढवण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षात पारदर्शक कामामुळे 320 कोटींचे दान 400 कोटींच्या घरात पोहोचलं आहे. या दानातून गोरगरिबांना, रुग्णांना मदत देण्याचं काम ट्रस्टद्वारे सुरु आहे. पुढे भविष्यातही हे होत राहणार आहे. भक्तीला समाजसेवेची जोड देण्याचे काम मंदिर प्रशासन करत आहे. सध्या सिद्धीविनायकाचा सोनेरी कळस, सोनेरी घुमट आणि आरस पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे,” असे मत सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी व्यक्त केलं (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें