सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर

वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असा इशाराच दरेकरांनी दिलाय.

सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजपा खपवून घेणार नाही - दरेकर
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:09 PM

मुबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. अशावेळी ” महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारलाय. दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर जोरदार निशाणा साधलाय.(Signs of lockdown in Maharashtra, strong opposition from Praveen Darekar)

सर्वसामान्यांना त्रास होईल असा लॉकडाऊन नको

लॉकडाउनच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं दरेकरांनी सांगितलं. सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करा आणि मगच टाळेबंदी लावा, अशी मागणी दरेकरांनी केलीय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचं पाहायला मिळतं. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्यसरकार जबाबदार असल्याचा आरोपही दरेकरांनी केलाय. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असा इशाराच दरेकरांनी दिलाय.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा आज मृत्यू झाला. त्यापूर्वी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागं होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही दरेकर यांनी केलीय.

राज्यातील करोना रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा दरेकरांनी केला आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी 400 व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडून आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दरेकरांनी यावेळी केलीय.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE : Maharashtra second Lockdown : तूर्तास लॉकडाऊन नाही, पण वाटचाल त्याच दिशेने : राजेश टोपे

Pune corona : चौथ्या टप्प्यातील लसीकरण, महापौरांनाही लस, 15 लाख नागरिकांना लस देण्याचं टार्गेट

Signs of lockdown in Maharashtra, strong opposition from Praveen Darekar

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.