मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी

मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी

मुंबई : मुंबई उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथे असलेल्या प्रसिद्ध मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत आठ विद्यार्थी जखमी झाले असून, यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून, ते आयसीयूमध्ये आहेत. विलेपार्ले येथीलच कूपर हॉस्पिटलमध्ये या तीन जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. इतर पाच विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईतील बहुतांश कॉलेजमध्ये सध्या फेस्टिव्हल सुरु आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सर्वच कॉलेजमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेजमध्येही फेस्टिव्हलमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डीवाईन पॉप सिंगरला बोलवण्यात आलं होतं. यावेळी फक्त मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. मात्र, यावेळी इतर कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा जण जबरदस्तीने मिठीबाई कॉलेजमध्ये घुसले आणि एकच गोंधळ उडाला.

ज्या मैदानात 1000 विद्यार्थी उभे राहण्याची क्षमता होती, त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी गोळा झाले. याच रुपांतर चेंगराचेंगरीमध्ये झालं. यात 8 विध्यार्थी जखमी झाले असून, कूपर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यातील जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे, तर तिघांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत.

एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कॉलेज विद्यार्थी जमा झाले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मिठीबाई कॉलेज वगळता इतर कॉलेजचे विद्यार्थी आत कसे घुसले, याचा तपास आता पोलिस करत आहेत.

Published On - 7:46 am, Fri, 21 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI