AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunday Mega Block: रविवारी लोकलचा प्रवास करताना सावध, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेवर नेहमीप्रमाणे दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर या रविवारी दिवसाचा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक काळात लोकल कमी असल्याने गर्दी होणार असल्याने नियोजन करूनच प्रवासाला लवकर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Sunday Mega Block: रविवारी लोकलचा प्रवास करताना सावध, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
| Updated on: Jun 20, 2025 | 10:58 PM
Share

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस कटकटीचा असतो. कारण दर रविवारी उपनगरीय मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जात असतो. आता रविवारी 20 जून रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ या स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक घेतला जाणार नाही. येथे नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात लोकल कमी असल्याने गर्दी होणार असल्याने नियोजन करूनच प्रवासाला लवकर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने मुंबई विभागात रविवार २२ जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतलेला आहे.

कुठे –  माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

मानखुर्द आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते १६.१५ पर्यंत

सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी,मुंबई येथून सकाळी १०.३७ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.

तसेच, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई – मानखुर्द आणि पनवेल – नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक , रविवारी दिवसा ब्लॉक नाही

बोरीवली आणि भाईंदर स्थानकांच्या दरम्यान शनिवारी रात्री ( दि. २१ आणि २२ च्या मध्यरात्री ) अप जलद मार्गावर रात्री ११.१५ ते मध्यरात्री २.४५ वा आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२.४५ ते सकाळी ०४.१५ वाजताच्या दरम्यान नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात विरार/वसई रोड ते बोरीवली दरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील.या संदर्भातील विस्तृत माहीती संबंधित स्थानकाच्या स्टेशन मास्तरांकडे पाहायला मिळेल. नाईट ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर रविवारचा दिवसाचा ब्लॉक घेण्यात येणार नाही असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन