सुनेत्रा पवारांना सर्वात मोठा झटका, राष्ट्रवादीचे 20-22 आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ

संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे की, सुनेत्रा पवार गटाचे 20-22 आमदार शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. काही आमदार निवडणुकीपूर्वी इतर पक्षात जातील. संजय राऊत यांच्या मते, अजित पवार गटातील आमदारांना महायुतीत 'गुलामगिरी' वाटत असल्याने ते घरवापसी करत आहेत. या संभाव्य पक्षफुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवारांना सर्वात मोठा झटका, राष्ट्रवादीचे 20-22 आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
| Updated on: Nov 11, 2026 | 10:42 AM

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचे 20 ते 22 आमदार फुटणार आहेत. हे सर्व आमदार शरद पवार यांच्या मूळ राष्ट्रवादीत येणार आहेत. म्हणजे त्यांची घर वापसी होणार आहे. तर काही आमदार निवडणुकीपूर्वी इतर पक्षात जातील, असं भाकीतच महाराष्ट्रातील बड्या नेत्याने केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार यांचे काही आमदार आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याने या नेत्याने केलेल्या विधानाने अधिकच खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीचे काही आमदार आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटणार आहेत. त्याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील. शरद पवारांना ते भेटत आहे. केवळ गप्पा मारण्यासाठी भेटत नाही. अजितदादांचं नेतृत्व राहिलं नाही. महायुतीत त्यांना गुलामी करावी लागत आहे. स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे हा आमदार स्वगृही परततील. त्याला विलिनीकरण म्हणत नाही. किंवा ते आमदार निवडणुकीआधी इतर पक्षात जातील. पण अमित शाहांनी निर्माण केलेला हा पक्ष फुटणार आहे, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

Loading...

चांगली गोष्ट आहे, भेटलं पाहिजे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. कौटुंबीक नाती आहेत. भेटलं पाहिजे. अजित पवारही दिवाळीत शरद पवारांना भेटायचे, असं राऊत म्हणाले.

सुनेत्रा पवारांचा पक्षव अंगवस्त्र

आम्हाला विचारल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस सुनेत्रा पवारांबद्दल बोलले असतील. शरद पवारांबाबत फडणवीस बोलले असतील असं वाटत नाही. सुनेत्रा पवारांचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र आहे. त्याबाबत ते निर्णय घेऊ शकतात. एकनाथ शिंदेंचा गट भाजपचं अंगवस्त्र आहे. त्याबाबत ते निर्णय घेतील. पण मूळ ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत ते निर्णय घेऊ शकत नाहीत, असंही त्यांनी ठणकावलं.

आमच्या पक्षात हालचाली नाही

काल मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी राजकीय चर्चाही झाली. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काहीही घडू शकतं हे प्रताप सरनाईक यांचं विधान आहे. ते त्यांच्या पुरतं राहू द्या. मी तर ते विधान केलं नाही. आमच्या पक्षाने केलं नाही. त्यांचा पक्ष अमित शाह यांनी तयार केला आहे. तो अमित शाहांच्या आदेशाने चालेल. आमच्या पक्षात काही हालचाली नाही. सरनाईक हे आमच्या घरी आले. जुने संबंध आहेत. त्यांना आईला भेटायचं होतं. ते मंत्री आहेत. आता भेट झाल्यावर राजकीय चर्चा होतात. विचारांची अदानप्रदान होते. ही अदानप्रदान झाली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. असं सूचक विधानही त्यांनी केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us