महापरीक्षा पोर्टल लवकरच रद्द करणार, काँग्रेस-राष्ट्रावादीच्या नेत्यांकडून जोरदार ‘फिल्डिंग’

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष पाहून राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घातल्याचं दिसत आहे (Supriya Sule and Satyajeet Tambe on Mahapariksha Portal).

महापरीक्षा पोर्टल लवकरच रद्द करणार, काँग्रेस-राष्ट्रावादीच्या नेत्यांकडून जोरदार 'फिल्डिंग'

मुंबई : सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घातल्याचं दिसत आहे (Supriya Sule and Satyajeet Tambe on Mahapariksha Portal). राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे (Supriya Sule and Satyajeet Tambe on Mahapariksha Portal). तसेच लवकरच महापरीक्षा पोर्टल रद्द करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सत्यजित तांबे म्हणाले, “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांमधून महापरीक्षा पोर्टल रद्द झालं पाहिजे ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. पुन्हा एमपीएससी किंवा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पारदर्शिपणे या जागांची भरती व्हावी, असं या युवकांचं म्हणणं आहे. युवक काँग्रेसच्यावतीने विधानसभा निवडणुकीच्याआधी आम्ही ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाचा युवकांचा जाहीरनामा तयार केला होता. त्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महापरीक्षा पोर्टल रद्द करु ही मागणी केली होती. आता आमचं महाविकासआघाडीचं सरकार आलं आहे. या सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पोर्टल रद्द करण्यात येईल, अशी मला खात्री आहे.”

“ज्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा व्यवस्था उभी केली त्यांचाच त्यावर विश्वास राहिला नसेल तर विद्यार्थ्यांचा विश्वास बसेल अशी व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच महापरीक्षा पोर्टल रद्द करुन एक अशी व्यवस्था उभी करु जी पारदर्शी असेल, त्यावर लोकांचा, युवकांचा विश्वास असेल. त्यातून निपक्ष पद्धतीने सरकारी नोकऱ्यांची भरती होईल.”

महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यासाठी युवक काँग्रेसकडून पाठपुरावा केला जाईल. लवकरच हे सरकार स्थिरस्थावर होईल. नवीन मंत्री कामाला सुरुवात करतील. त्यानंतर तातडीने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय आमचं सरकार घेईल, असंही मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रविवारीच (1 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना रितसर पत्रही दिलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाले, “शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेलं महापोर्टल बंद करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली. या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय. त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Published On - 7:55 pm, Mon, 2 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI