AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule on Ajit Pawar: सर्व काही उद्धवस्त, लाडक्या दादाच्या मृत्यूनंतर ताईला शोक अनावर, सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स

Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्राचे रुबाबदार नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळील भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स समोर आले आहे. या घटनेने बारामतीतच नाही दर देशात खळबळ उडाली आहे.

Supriya Sule on Ajit Pawar: सर्व काही उद्धवस्त, लाडक्या दादाच्या मृत्यूनंतर ताईला शोक अनावर, सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स
अजितदादा पवार, सुप्रिया सुळेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 11:41 AM
Share

Supriya Sule WhatsApp Status: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे. अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. दरम्यान लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. सकाळी त्यांचा व्हॉट्सॲप स्टेट्‍सवर Devasted ‘उद्धवस्त’ असे लिहिलेले होते. एकाच शब्दात आपलं किती नुकसान झालं, पवार कुटुंबियांचं, राष्ट्रवादी पक्षाचं किती नुकसान झालं याचा संदेशच त्यांनी दिला.

आज सकाळी नियोजीत सभेसाठी अजितदादा हे बारामतीसाठी निघाले. बारामती विमानतळावर विमान लॅडिंग करण्यापूर्वीच ते हेलकावे खात खाली कोसळले. शेजारील शेतात विमान कोसळले. सकाळी 8:30 वाजेच्या आसपास विमान कोसळल्याचे समजते. त्यावेळी आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी धाव घेतली. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, दोन पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हे छोटेखानी विमान लॅडिंगसाठी प्रयत्न करत होते. त्याने अगोदर एक फेरी मारली. पण दुसऱ्या फेरीवेळी विमानाचा मोठा आवाज येत होता. त्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्याने प्रत्यक्षदर्शी धावले. पण एकामागून एक स्फोट झाल्याने कुणालाही मदतीला धावता आले नाही. तातडीने यंत्रणांना फोन करण्यात आला. या विमान अपघातात अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजातच सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्षाचे मोठे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी धायमोकलून रडत आहेत. अनेकांसाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे.

उद्धवस्त

तर सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी या दिल्लीत होत्या. त्या सकाळीच ही वार्ता कळताच बारामतीसाठी निघाल्या. दरम्यान सुप्रिया सुळे यांना लाडका दादा गेल्याने शोक अनावर झाला. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्‍सवर उद्धवस्त असे लिहिलेले होते. एकाच शब्दात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पवार कुटुंबात शरद पवार यांच्या नंतर एक मोठा आधारवड हे अजित पवार हे होते. त्यांच्या अशा अकाली एक्झिटने अनेकांना धक्का बसला. तसा पवार कुटुंबियांनाही बसला. सुप्रिया सुळे या अजितदादांच्या सोबतच राजकारणात वावरल्या. अजित पवार हे त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. आपला हक्काचा दादा असा अचानक सोडून गेल्याने त्यांचे मन सैरभैर झाले. एका शब्दात त्यांनी त्यांच्यावर, कुटुंबावर, पक्षावर, कार्यकर्त्यांवर काळाने काय घाला घातला हे व्यक्त केले.

दरम्यान आज सकाळी अजितदादा हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी मुंबईवरून निघाले होते. बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश दिसून येत आहे. बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवारांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली, ट्विटमध्ये काय?
अजित पवारांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली, ट्विटमध्ये काय?.
अपघातात अजित पवारांचा मृत्यू, संजय शिरसाट यांच्याकडून श्रद्धांजली
अपघातात अजित पवारांचा मृत्यू, संजय शिरसाट यांच्याकडून श्रद्धांजली.
... अन् रुग्णालयाबाहेर युगेंद्र पवार धाय मोकलून रडायला लागले
... अन् रुग्णालयाबाहेर युगेंद्र पवार धाय मोकलून रडायला लागले.
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना.
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक.
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.